शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणी निर्णय घ्या!

By admin | Updated: July 29, 2016 02:04 IST

मावळमध्ये २०११ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी तपास यंत्रणांनी आरोपी असलेल्या पोलिसांवरील केस बंद करण्यासाठी वडगाव-मावळ दंडाधिकाऱ्यांपुढे क्लोझर रिपोर्ट दाखल केला आहे

मुंबई : मावळमध्ये २०११ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी तपास यंत्रणांनी आरोपी असलेल्या पोलिसांवरील केस बंद करण्यासाठी वडगाव-मावळ दंडाधिकाऱ्यांपुढे क्लोझर रिपोर्ट दाखल केला आहे, तर इंडिका कारमधून गोळीबार केल्याप्रकणी पोलिसांनी आरोपी हाताला लागत नसल्याने ‘ए’ समरी रिपोर्ट दाखल केला आहे. या दोन्ही अहवालांवर दंडाधिकाऱ्यांनी निर्णय न घेतल्याने गुरुवारी उच्च न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना या अहवालांवर आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले.पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी सोडण्याच्या शसनाच्या निर्णयाला मावळ येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांनी महामार्गावर आंदोलन केले असता, तेथे असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) संदीप कर्णिक यांनी केलेल्या गोळीबारात वृद्धेचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी सर्व आरोपी पोलिसांविरुद्ध पुरावे नसल्याने केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी वडगाव-मावळ दंडाधिकाऱ्यांपुढे क्लोझर रिपोर्ट दाखल केला आहे.परंतु राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या आयोगाने संदीप कर्णिक यांना गोळीबारासाठी जबाबदार धरले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका आय. जी. खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांपुढे ‘सी’ समरी रिपोर्टबरोबरच शेतकऱ्यांच्या जमावावर इंडिका कारमधून गोळीबार करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध ‘ए’ समरी रिपोर्ट (अज्ञात व्यक्ती फरारी असल्याने पुढील कारवाई होऊ शकत नाही) दाखल केला आहे. मात्र, या दोन्ही अहवालांवर दंडाधिकाऱ्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही, अशी माहिती खंडेलवाल यांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)दंडाधिकाऱ्याच्या निर्णयानंतर सुनावणीदंडाधिकाऱ्यांनी या अहवालांवर निर्णय घेतल्याशिवाय आम्ही या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने वडगाव-मावळ दंडाधिकाऱ्यांना आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ आॅक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.