शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

कल्याणची ‘डेक्कन क्वीन’ अर्थात शोभा

By admin | Updated: August 25, 2016 03:46 IST

२१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावून ठाणे पोलीस आयुक्तालयाची मान उंचावली आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- महिला पोलीस या नात्याने कर्तव्य बजावत असतानाच कल्याणच्या शोभा देसाई यांनी ‘आयडीबीआय लाईफ इन्शुरन्स हाफ मॅरेथॉन-२०१६’ या स्पर्धेत २१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावून ठाणे पोलीस आयुक्तालयाची मान उंचावली आहे. शोभा यांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळविले आहेत. सिंगापूर येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेतही त्यांनी चौथा व सातव्या क्रमांकाची बाजी मारली. शोभा या पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर १९९५ सालापासून कार्यरत आहेत. सध्या त्या कल्याणमधील आग्रा रोडवरील पंचधारा सोसायटीत राहतात. त्यांना एक मुलगी आहे. ती इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते. आईचा धावण्याचा गुण तिच्यातही आहे. शोभा यांना शालेय जीवनापासूनच धावण्याची आवड होती. मे महिन्यात पार पडलेल्या आशियाई मास्टर्स स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत दोन किलोमीटर अंतरात चौथ्या स्थानावर व पाच किलोमीटर अंतरात सातव्या क्रमांकावर त्या आल्या आहेत. २४ जुलै रोजी मुंबईतील ‘रन इंडिया रन’ या २०१६ सालच्या १० किलोमीटरच्या स्पर्धेत शोभा यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. ही स्पर्धा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार पडली होती. ७ आॅगस्ट रोजी मान्सून दहा किलोमीटर स्पर्धेत शोभा यांनी पुन्हा पहिल्या क्रमांकाची बाजी मारली. शोभा सध्या कल्याण डोेंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या पोलीस संरक्षण पथकात कार्यरत आहेत. स्पर्धेची तयारी त्या स्वखर्चातूनच करतात. त्यांचा अर्धा पगार त्यांच्या धावण्याच्या सरावावर खर्च होतो. सिंगापूर येथे भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेलेल्या शोभा यांना पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ३५ हजार रुपयांची मदत केली होती. तसेच तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनीही आर्थिक मदतीचा हात दिला होता. पोलीस दलातून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सूट दिली जाते. >पोलिस दलात शारीरीक फिटनेसला खूप महत्व आहे. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शोभा या अगदी फिट आहेत. पोलीस दलात अनेक लोक विविध कामगिरी करीत असता. अनेकांकडे क्रीडा व अन्य कौशल्ये अंगभूत असतात. त्यांना वाव मिळत नाही. त्यांचे कौतुकही केले जात नाही. त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळाला तर खरोखरच त्यांच्या मेहनतीचे चीज होऊ पोलीस दलाचे नाव आणखीन मोठे होण्यास मदत होऊ शकते. शोभा यांनाही मदतीच्या हाताची आवश्यकता आहे. त्यांना मदत मिळाल्यास त्या अधिक चमकदार कामगिरी करु शकतात.