शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवरून कोंडी कायम

By admin | Updated: March 16, 2017 00:25 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कामकाज नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घेत प्रचंड गदारोळ घातल्याने विधानसभा अािण विधान परिषदेचे कामकाज

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कामकाज नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घेत प्रचंड गदारोळ घातल्याने विधानसभा अािण विधान परिषदेचे कामकाज आज प्रत्येकी तीन वेळा तहकूब झाल्यानंतर दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. कर्जमाफीवरून झालेली कोंडी कायम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या या संदर्भात विधानसभेत निवेदन करण्याची शक्यता आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीची जोरदार मागणी केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे कर्जमाफीच्या मागणीसाठी पुण्यात उपोषणाला बसले होते तेव्हा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सरकार कर्जमाफीची घोषणा मार्च २०१७ पूर्वी करेल, असे आश्वासन देऊन त्यांनी आढाव यांचे उपोषण सोडविले होते याची आठवण विखे पाटील यांनी करून दिली. त्याचवेळी सदस्यांची घोषणाबाजी सुरु होती. कर्जमाफीच्या मागण्यांचे फलकही त्यांनी फडकविले.या गदारोळात तीनवेळा तहकूब झाले आणि नंतर गोंधळातच ते उरकण्यात आले. (विशेष प्रतिनिधी) शिवसेनेची समंजस भूमिकाकर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळ ठप्प झाल्यानंतर सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर ते मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’वर गेले. दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीवरून उद्या सभागृहात निवेदन करावे. सभागृहाचे कामकाज चालावे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणीही मान्य व्हावी अशी आमची भूमिका आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अशी मागणीही आम्ही त्यांच्याकडे आज केली. कर्नाटकच्या धर्तीवर प्रस्ताव पाठवू कर्जमाफीसारखा मोठा निर्णय तडकाफडकी घेता येणार नाही. हा निर्णय घेतल्यास त्यात राज्याचा हिस्सा किती, केंद्राकडे किती निधी मागायचा हे ठरवावे लागेल. कर्नाटकने अलीकडेच कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव पाठवायला हवा, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत व्यक्त केले.कर्जमाफीचा केंद्र पातळीवर निर्णय!उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह काही राज्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते अशीही चर्चा आहे.