शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

By admin | Updated: August 25, 2016 02:34 IST

प्रसूतीसाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूची घटना बुधवारी सकाळी घडली.

नवी मुंबई : प्रसूतीसाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूची घटना बुधवारी सकाळी घडली. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होवू लागल्यामुळे प्रकृती खालावल्याने सदर महिलेला तत्काळ जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी दाखल करून न घेतल्यामुळे परत तिला वाशीतील पालिका रुग्णालयात आणले असता काही तासात तिचा मृत्यू झाला.सुमन दळवी असे महिलेचे नाव असून ती २० आॅगस्ट रोजी प्रसूतीसाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल झाली होती. मंगळवारी तिची प्रसूती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. यामुळे प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविले होते. त्यापूर्वी पालिका रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिथल्या डॉक्टरांसोबत बोलून घटनेची माहिती दिली होती. मात्र मंगळवारी रात्री ही महिला रुग्णवाहिकेतून त्याठिकाणी गेली असता, खाट उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले. त्यानुसार वाशीतील पालिका रुग्णालयातच या महिलेवर उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर डॉक्टर व पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.