शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

By admin | Updated: July 17, 2016 19:53 IST

भरधाव मोटारीची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास भांडारकर रस्त्यावर घडला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १७ : भरधाव मोटारीची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास भांडारकर रस्त्यावर घडला. अपघातानंतर पळून जात असलेल्या चालकाला नागरिकांनी पाठलाग करुन पकडले. जखमी महिलेला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ही मोटार कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर चालवित होते अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले यांनी दिली. अरुंधती गिरीष हसबनीस (वय 27, रा. विलोचन रेसिडेन्सी, न-हे) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर (वय 70) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रम सुशील धुत (वय 35, रा. इंद्रजीत अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंधती या पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करतात. तर त्यांचे पती एका संगणक कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांना अडीच वर्षांचा ओजस नावाचा मुलगा आहे. रविवारी दुपारी अरुंधती त्यांच्या दुचाकीवरुन भांडारकर रस्त्यावरुन मैत्रीणीकडे जात होत्या. लॉ कॉलेज रस्त्याकडून त्या गुडलक हॉटेलच्या दिशेने जात होत्या. त्याच वेळी पाठीमागून अभ्यंकर त्यांच्या मोटारीमधून पत्नीसह गुडलक चौकाच्या दिशेने जात होते. ते स्वत: चालवीत असलेल्या भरधाव मोटारीची अरुंधती यांच्या दुचाकीला धडक बसली. भांडारकर रस्त्यावरील बँक आॅफ बडोदासमोर झालेली ही धडक एवढी जोरात होती की अरुंधती रस्त्यावर जोरात आदळल्यामुळे हेल्मेटही तुटले. हेल्मेट असूनही त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. अपघातानंतर आयसीआयसीआय बँकेच्या बोळामधून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठीमागून येत असलेल्या पोलिसांसह नागरिकांनी अभ्यंकर यांना पकडले. दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती कळवून कौस्तुभ अण्णाराव तांभाळे (वय 23, रा. नंदादीप अपार्टमेंट, पत्रकारनगर, गोखलेनगर) यांनी अरुंधती यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अभ्यंकर यांना ताब्यात घेतले. त्यांची मोटार आणि अपघातग्रस्त दुचाकी प्रभात पोलीस चौकीमध्ये आणण्यात आली. दरम्यान, अरुंधती यांच्या पतीला अपघाताची माहिती कळवण्यात आली. त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. =========मी गुडलक चौकाकडून लॉ कॉलेजच्या दिशेने मोटारीमधून जात होतो. बँक आॅफ बडोदापासून थोडे पुढे गेल्यावर पाठीमागून आलेल्या एका नागरिकाने मला एक महिला दुचाकी घसरुन पडली असून पाठीमागे अपघात झाल्याचे सांगितले. मी मोटार वळवून पाठीमागे जाऊन पहात असताना नागरिकांनी मलाच पकडले. पोलीस आल्यावर ते मला पोलीस चौकीमध्ये घेऊन आले. मी अपघात केलेला नाही. - मुकुंद अभ्यंकर