शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीतील मृत्यूंचे प्रमाण शून्यावर यावे - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:18 IST

पोलीस कोठडीतील मृत्यूंत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत घट झाली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हे प्रमाण ‘शून्य’ असले पाहिजे

मुंबई : पोलीस कोठडीतील मृत्यूंत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत घट झाली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हे प्रमाण ‘शून्य’ असले पाहिजे, असे म्हटले. तसेच किरकोळ गुन्ह्यातील आरोपींची शक्यतो रात्री चौकशी न करण्याची सूचनाही उच्च न्यालालयाने या वेळी केली. पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी इंडियन सेंटर फॉर ह्युमन राईट्सने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठापुढे होती.गुरुवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी मृत्यूबाबत उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. या अहवालानुसार, २०१५मध्ये १८ आरोपींचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. तर २०१६मध्ये १० आणि २०१७च्या या दोन महिन्यांत एकही आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला नाही. पोलीस कोठडी मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र हे प्रमाण शून्यावर आले पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले. तसेच किरकोळ गुन्ह्यांतील आरोपींची शक्यतो रात्री चौकशी करू नका, अशीही सूचना या वेळी खंडपीठाने राज्य सरकारला केली. त्यावर सरकारी वकिलांनी खंडपीठाला असे निर्देश देऊ नका, अशी विनंती केली. ‘कधीकधी किरकोळ गुन्ह्यातील आरोपी मोठमोठ्या गुन्ह्यांबद्दल माहिती देतात. असे अनेक गुन्हे सांगण्यासारखे आहेत. त्यामुळे रात्री चौकशी न करण्याचे निर्देश देऊ नयेत,’ अशी विनंती सरकारी वकिलांनी खंडपीठाला केली. तर खंडपीठाने हे निर्देश नसून केवळ सूचना आहे, असे स्पष्ट केले.दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी २६ जिल्ह्यांमधील सिव्हिल रुग्णालयात फॉरेन्सिक वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती करणार असल्याची माहितीही सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)