शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: April 2, 2017 01:54 IST

खामगावातील घटना; १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

खामगाव, दि. १- अभ्यास करून मित्राला दुचाकीवरून घरी सोडून परतणार्‍या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा टॉवर चौकात घडली. शहरातील पत्रकार राजकुमार गोयनका यांचा मुलगा मधुर (वय १६) हा येथील एसएसडीव्ही शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. सीबीएससी पॅटर्न असलेल्या दहावीची येत्या ८ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मधुर हा शनिवारी त्याच्या घरी हर्षल जोशी आणि मुकुंद अग्रवालसह अभ्यास करत होता. रात्री दरम्यान अभ्यास पूर्ण झाल्याने तो मित्र मुकुंद यास त्याच्या घरी रायगड कॉलनीमध्ये सोडण्यासाठी गेला होता, त्यावेळी तो आणि त्याचा मित्र हर्षल हे दुचाकी क्र.एमएच३0-एस ७१९६ ने घरी परतत असताना टॉवर चौकमधून नांदुर्‍याकडे भरधाव जाणार्‍या ट्रक क्र.एमएच ३0 झेड-१९११ ने मधुरच्या दुचाकीस समोरून धडक देऊन त्यास चिरडले. या दुर्दैवी अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मित्र हर्षल हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक आणि ट्रकचालकास ताब्यात घेतले. या घटनेमुळे गोयनका कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. मधुर हा मनमिळावू स्वभावाचा म्हणून सर्वांमध्ये परिचीत होता.