शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१०८ ची रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने ६ वर्षाच्या बालकाचा मृत्यू

By admin | Updated: September 12, 2016 07:53 IST

अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एका ६ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. ११ : अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एका ६ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्हयातील बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना (पुनर्वसन) येथे घडली.येथील रोहीत सुरेश मोहिते (६) या बालकाला राहत्या घरी झोपलेल्या अवस्थेत १० सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर सर्पदंश झाला. सर्वच जण झोपलेले असल्याने ही बाब कळली नाही. परंतु काही वेळेनंतर रोहितला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व तोंडातून फेस गळत असल्याने त्याला सर्पदंश झाल्याचे आईवडिलांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ३.५७ वाजता १०८ या रुग्णवाहिका सेवेला फोन करून कळविले.

परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मोहिते यांनी पुन्हा ४.३४ वाजता फोन केला. तेव्हा पातूर व बार्शीटाकळी येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नातेवाइकांना खासगी वाहनाने बालकास बार्शीटाकळीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी अकोला पाठविण्याचा सल्ला दिला. खाजगी वाहनाने नेऊन बालकाला जिल्हा समान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी रोहीतला मृत घोषित केले.

११ सप्टेंब रोजी रोहितवर जनुना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहितच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ आहे. १०८ वरील रुग्णवाहिका जर वेळेवर उपलब्ध झाली असती तर रोहितचे प्राण वाचले असते. परंतु रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने रोहितचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला.