शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मोर्चावरील लाठीमारानंतर पोलिसाचा मृत्यू

By admin | Updated: October 4, 2016 22:15 IST

मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारानंतरच्या धावपळीत पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.04 -  मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारानंतरच्या धावपळीत पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मुंबईहून आलेल्या या कर्मचा-याचा मृत्यू हदयविकाराने झाल्याचा अंदाज आहे.राहुल प्रकाश कांबळे (५३, बक्कल नंबर १६२०) असे मरण पावलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. कांबळे हे मुंबईतील बोरिवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते.  मंत्रिमंडळ बैठकीच्या बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी राज्यभरातील पोलीस कर्मचारी औरंगाबादेत आले होते. आमखास मैदानाजवळ  पोहेकॉ. राहुल कांबळे हे अन्य अधिकारी, कर्मचा-यांसह तैनात होते. राज्यातील कायम विनाअनुदानित शिक्षक संघटनेचा मोर्चा आमखास मैदानासमोर अडविण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक रस्त्यावरच ठिय्या मांडून होते. सुमारे चार तास बसून असलेल्या शिक्षकांनी अग्निशामक दलाची गाडी अडवल्यानंतर पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. या वादानंतर पोलिसांनी लाठीहल्ला सुरू करताच मोर्चेकºयांनी दगड भिरकावले. या धावपळीत पोहेकॉ कांबळे यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते फूटपाथवर जाऊन बसले आणि तेथेच बेशुद्ध झाले. तेथे तैनात असलेल्या शासकीय अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोहेकॉ कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, सहायक आयुक्त रविकांत बुवा यांनी घाटीत धाव घेतली.  या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना कळविण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.