शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशीच मृत्युदंड !

By admin | Updated: July 30, 2015 01:29 IST

त्रेपन्नाव्या वाढदिवशीच याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्यात येणार असल्याने याकूबसह त्याचे कुटुंबीयही सुन्न झाले आहेत. त्याला फाशी दिली जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांनी

- नरेश डोंगरे,  नागपूरत्रेपन्नाव्या वाढदिवशीच याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्यात येणार असल्याने याकूबसह त्याचे कुटुंबीयही सुन्न झाले आहेत. त्याला फाशी दिली जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांनी याकूबचा भाऊ सुलेमान मेमन याला काही प्रश्न केले. तो कसाबसा भावना आवरत म्हणाला, की माझा न्यायव्यवस्थेवर, अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे.बुधवारी सकाळी ८.३०च्या सुमारास सुलेमान मुंबईहून नागपूर विमानतळावर पोहोचला. त्याला आधी दुपारी याकूबची भेट होईल, असे सांगण्यात आले होते. नंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर याकूबची भेट होईल, असे कळविण्यात आले. त्यामुळे सुलेमान सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबला. सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या याचिकेवर दिलेल्या निकालापाठोपाठ राज्यपालांनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याचे वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केले. तेव्हा दुपारी ४.३० वाजता तो खाली आला. माध्यमांनी त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर त्याने सुरुवातीला माझा न्यायव्यवस्थेवर, अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे, असे सांगितले. पण आता काय करणार, हा आणि अन्य काही प्रश्न केले असता ‘प्लीज, लिव्ह मी अलोन’ असे तो जवळपास ओरडतच म्हणाला.त्याने ते हॉटेल सोडले आणि कारागृहाकडे जायला निघाला. मात्र मधेच चालकाला त्याने कार रेल्वे स्थानकावर वळवायला लावली. एका कोपऱ्यात कार थांबवायला लावून त्याने हमसून हमसून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली अन् नंतर अज्ञात स्थळी निघून गेला. दुसरीकडे याच हॉटेलमध्ये मंगळवारपासून मुक्कामी असलेला चुलत भाऊ उस्मान मेमनने दुपारी ४.३० ला आपल्या रूमचे दार लावून घेतले. मी म्हणेन तोपर्यंत कुणीही काहीही विचारायचे नाही, अशा सूचना त्याने हॉटेल व्यवस्थापनाला दिल्या. गेल्या आठ वर्षांपासून याकूब नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. ३० जुलै त्याची जन्मतारीख असल्यामुळे आतापावेतो प्रत्येक वर्षी त्याचे नातेवाईक वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला येऊन त्याची भेट घ्यायचे. त्याच्याशी गप्पा करणे, गोडधोड खाऊ घालणे, असे प्रकार व्हायचे.याकूब फाशीचा कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनही गेल्या वर्षीपर्यंत वाढदिवसाच्या दिवशी याकूब आणि त्याच्या कुटुंबीयांना या गोष्टीसाठी सूट देत होते. मात्र १४ जुलैला याकूबचा डेथ वॉरंट घोषित झाल्यापासून व वाढदिवसालाच अर्थात ३० जुलैला फाशी देण्याचे ठरल्यामुळे कारागृह प्रशासन प्रत्येक गोष्ट जेल मॅन्युअलप्रमाणे करीत आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आम्ही बर्थ डे केक पाठवू. मध्यरात्री तो कापला जावा, अशी सूचनावजा विनंती याकूबच्या नातेवाइकांनी काही दिवसांपूर्वी केली होती. प्रशासनाने तीसुद्धा फेटाळली.