शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By admin | Updated: July 14, 2016 04:00 IST

मुलाचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समजताच धक्क्याने आजारी असलेल्या आईनेदेखील प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना खालापूर गावात घडली.

वावोशी/रायगड : मुलाचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समजताच धक्क्याने आजारी असलेल्या आईनेदेखील प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना खालापूर गावात घडली.गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत गोविंदराव बोंदाऱ्डे यांच्या पत्नी कमला (८६) काही दिवसांपासून आजारी होत्या. कमलाबाई यांना खोपोलीतील डोंगरे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री यांचा मोठा मुलगा प्रकाश (६५) कु टुंबासहआईला जेवणाचा डबा घेऊन गेले होते. सोमवारी आठ वाजण्याच्या सुमारास प्रकाश आईच्या शेजारी स्टूलवर बसत होते. त्या वेळी स्टूलचा अंदाज न आल्यामुळे पाठीमागे तोल जाऊन ते कोसळले. त्या वेळी प्रकाश यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी बेडचा कोपरा लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. डोंगरे रुग्णालयातील डॉक्टर कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे प्रकाश यांना तातडीने खोपोलीतील डॉ. मोहिते रुग्णालयात हलविण्याचे ठरले. याच दरम्यान प्रकाश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने खोपोलीतील रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलाला लागलेला मार पाहून व्यथित झालेल्या कमलाबाई यांनी नातेवाईकांकडे प्रकाशच्या तब्येतीची विचारपूस केली. मुलाच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेय, याची कल्पना आल्यानंतर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कमलाबाई यांनादेखील हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. काही तासांच्या अंतराने बोंदाऱ्डे कुटुंबावरओढावलेल्या संकटामुळे संपूर्ण खालापूर गाव सुन्न झाले. मंगळवारी शोकाकुल वातावरणात आई आणि मुलावर खालापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)