शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणादरम्यान बालिकेचा मृत्यू

By admin | Updated: November 13, 2015 00:38 IST

लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला येथे शासकीय लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. मात्र लस दिल्यानंतर अवघ्या काही तासात लक्ष्मी नामक दोन महिन्याच्या चिमकुलीचा मृत्यू झाला.

वरोरा : लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला येथे शासकीय लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. मात्र लस दिल्यानंतर अवघ्या काही तासात लक्ष्मी नामक दोन महिन्याच्या चिमकुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाच्या लसीकरण कार्यक्रमाची धास्ती घेतली आहे. सदर घटना वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोणार गावात घडली.वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोणार गावात कोसरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बालकांसाठी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथील कर्मचारी सहभागी झाले होते. लोणार गावात लक्ष्मी शंकर बोधे या दोन महिन्यांच्या बालिकेसह पाच बालकांना लसीकरण करण्यात आले. लस दिल्यानंतर अर्ध्या तासात लक्ष्मीची प्रकृती बिघडली. तिला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष्मीला मृत घोषित केले. लक्ष्मीचा मृत्यू लसीकरणाने झाल्याची तक्रार शेगाव पोलिसात करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू उपलब्ध नसल्याने तिचे शवविच्छेदन चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. लसीकरण झाल्यानंतर लक्ष्मीचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली आहे. संबंधिताचे बयाण नोंदविले आहे. लसीकरणानंतर लक्ष्मीचा मृत्यू झाल्याने ग्रामीण भागात लसीकरणाबाबत भीती व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)