शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

मृत जलस्रोतांना नवसंजीवनी!

By admin | Updated: May 24, 2015 01:39 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या.

राजेश भोजेकर ल्ल वर्धापाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या. यातील मृत जलस्रोत जिवंत करून भूगर्भातील जलसाठा वाढविण्यावर भर देणारी योजना उपयुक्त ठरली आहे. तामसवाडा येथील शेतकऱ्यांनी ही योजना राबवून परिसर जलयुक्त केला. ‘उगम ते संगम’ या तत्त्वावर शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या केलेला हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला मार्गदर्शक ठरला आहे.पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. यामुळे लाखो लिटर पाणी नदी व नाल्याद्वारे वाहून जाते. परिणामी, पावसाळा संपला की शेतपिकांसाठी तर दूरच पिण्याकरिताही पाणी मिळत नाही. हे ध्यानी घेऊन तामसवाडा येथे नाल्याचा उगम ते नदीला मिळेपर्यंतच्या पात्राचे सर्वेक्षण करण्यात आले. या नाल्याच्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न तेथील शेतकऱ्यांनी केला. या प्रयोगाला १०० टक्के यशही मिळाले.तामसवाडा नाला गाळविरहित करण्यात आला. शिवाय रुंदीकरण, विविध प्रकारचे माती बांध, दगडी, गॅबियन, सिमेंट बांध आदी कामे जलसंधारणासाठी मिळणारा विशेष निधी व स्थानिक विकास योजनेतून करण्यात आली. यामुळे आठ किमी लांबीच्या या नाल्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातही सुमारे अडीच लाख क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध आहे. शिवाय या प्रकल्पामुळे परिसरातील सहा गावांतील विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील आदिवासीबहुल तामसवाडा शिवारातून वाहणाऱ्या या नाल्याला पावसाळ्यात पूर यायचा. त्यामुळे हजारो एकर शेती खरडून जात होती. पावसाळा संपल्यावर मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असे. मग काय, जनावरांसह येथील कुटुंबांना स्थलांतर करावे लागत होते. यंदा मात्र या शेतकरी, ग्रामस्थांवर ही वेळ येणार नाही. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने ही समस्या कायम निकाली निघाली आहे. पावसाचे पाणी एकमेव स्रोत असल्यामुळे जलसंधारणाच्या या प्रयोगमध्ये मृत नाल्याचे पुनरुज्जीवन केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मे महिन्याच्या मध्यातही पाणीसाठा असल्यामुळे शेतकरी तिसरे उन्हाळी पीक घेत आहेत. - माधव कोटस्थाने, प्रकल्प अभियंता तथा सदस्य,केंद्रीय बांधकाम पाणलोट व्यवस्थापन संचालन समिती, वर्धा.च्उगम ते संगम या तत्त्वानुसार तामसवाडा येथील नाल्याचे ३५० मीटर लांबीपर्यंतचे २५ भाग करून प्रत्येक भागात पावसाचे पाणी अडवून साठविण्यात आले. शिरपूर पॅटर्ननुसार बांधलल्या या प्रकल्पामध्ये पाणी संथगतीने वाहणे, प्रत्येक भागात साठवणे सहजशक्य झाले आहे. यामुळे संगामाकडील भागात जलसाठा होतो व पुनर्भरण होते. च्या उपक्रमामुळे मागील दोन पावसाळ्यांत ७० हजार क्युसेक मीटर पाणीसाठा झाला असून सुमारे पाच लक्ष क्युसेक मीटर पाणी भूगर्भात मुरले. त्यामुळेच सहा गावातील ४५ ते ५० विहिरीतील जलसाठ्यात सुमारे पाच मीटरपर्यंत वाढ झाली आहे. २४ तास पाणीपिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या सहा गावांना आता नाला पुनर्भरण प्रकल्पामुळे २४ तास पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला ४५ फूट पाणी उलपब्ध आहे.