प्रशांत हेलोंडे, ल्ल वर्धा
शासकीय बदल्यांमधील घोळाची परंपरा जुनीच आहे. पण हा घोळ आता हयात कर्मचा:यांर्पयतच मर्यादित राहिलेला नाही. कारण शासनाने चक्क मृत आणि सेवानिवृत्त कर्मचा:यांच्याही बदल्या करण्याची किमया साधली आहे. अवैद्यकीय सहायक कुष्ठरोग संवर्गातील कर्मचा:यांच्या बदल्या करताना आरोग्यसेवा संचालनालय, मुंबई आणि सहसंचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग, क्षयरोग पुणो यांनी हा प्रताप केला आह़े
संचालनालयाद्वारे 3क् मे रोजी बदल्या केल्या़ बदली केलेल्या कर्मचा:यांत एस़एस़ वाघमारे, डी़ए़ भटकरे, वाय़बी़ घाटे, पी़आऱ चिमुटे, आऱएस़ वरहारे, डी़बी़ साळवे, आऱएस़ सोनकांबळे यांच्यासह अन्य कर्मचा:यांचा समावेश आह़े मात्र कुष्ठरोग केंद्र उदगीर लातूर येथे कार्यरत एस़एस़ वाघमारे यांचे जानेवारी 2क्14मध्ये निधन झाले आहे. त्यांना बदली क्ऱ22नुसार प्रशासकीय बदली मंजूर करून कुष्ठरोग केंद्र सोलापूरचा आदेश देण्यात आला़ तसेच कुष्ठरोग नागपूर येथे कार्यरत डी़ए़ भटकरे यांना क्ऱ 19 अन्वये चंद्रपूर येथे प्रशासकीय बदली दिली़ वास्तविक, भटकरे 3क् एप्रिल 2क्14 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
हाच प्रकार सोलापुरातील वाय़ बी़ घाटे यांच्याबाबतीतही झाला आहे. त्यांना बदली क्र. 21नुसार
लातूर येथे बदली देण्यात आली़ वास्तविक, ते 3क् सप्टेंबर रोजी निवृत्त झाल़े निवृत्तीस पात्र असल्याने ही बदली व्यर्थ ठरते. नागपूर येथील चिमुटे यांना गडचिरोली येथे रिक्त पद नसताना बदली दिली़ यवतमाळ येथील साळवे यांना नागपूर व सोलापूर येथील सोनकांबळे यांना हिंगोली येथे प्रशासकीय बदली केली होती़
यानंतर तीन महिन्यांनी शुद्धिपत्रकामार्फत दोन्ही कर्मचा:यांना पुन्हा बदली आदेश दिल़े यात
साळवे यांना नागपूर मुख्यालय तर सोनकांबळे यांना सोलापूर येथे बदली देण्यात आली आहे.
च्ग्रामीण रुग्णालय नरखेड जि़ नागपूर येथे कार्यरत आऱएस़ वरहारे यांनी विनंती बदली अर्ज सादर केला होता़ त्यांनी स्वगावी वर्धा येथे बदलीची विनंती केली़ ते बदलीस पात्र असल्याने क्र. 77नुसार त्यांना बदली मंजूर करण्यात आल्याचे कळविल़े
च्बदलीच्या यादीत नाव असल्याने ते वर्धा येथे रुजू होण्यास गेले असता त्यांना रुजू करून घेतले नाही़ याबाबत त्यांनी मुख्य प्रशासन अधिकारी आरोग्य संचलनालय पुणो यांना निवेदने दिली; पण कारवाई झाली नाही़ त्यांना वेतनही नाही व बदलीचे आदेशही नाही़
स्थानांतरण आदेशांमध्ये मृतक, सेवानिवृत्त कर्मचा:यांचा समावेश आहे. या प्रकरणी सीईओसह संबंधित अधिका:यांवर कारवाई प्रस्तावित आह़े बदल्यांतील अनियमितता दूर करून सर्व बदल्या नियमित करण्यात येतील, अशी माहिती आरोग्य सेवा संचलनालयाचे संचालक डॉ़ सतीश पवार यांनी दिली.