शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दिवस वाहतूककोंडीचा

By admin | Updated: September 23, 2016 04:34 IST

मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज ये-जा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे

ठाणे : मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज येजा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे शहरात न भुतो न भविष्यती अशी वाहतूककोंडी गुरुवारी अनुभवायला मिळाली. वाहतूकव्यवस्थेतील या बदलाबरोबरच बंदी धाब्यावर बसवून अवजड वाहनांनी शहरात केलेल्या बिनदिक्कत प्रवेशामुळे दहिसर ते वांद्रे भागातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. तीन तासांहून अधिक काळ प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले होते. वरसोवा पूल नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतून येणारी ही वाहने ठाण्यातून जाऊ लागल्याने नाशिक रोडवरील ताण वाढला आहे. त्याचा फटका ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरांतील वाहतुकीला बसल्याने गुरुवारी सकाळपासून दिवसभर ठाणे जाम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. वाहतूककोंडीत सापडल्याने हैराण झालेल्या वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, कंटाळलेल्या प्रवाशांनी पायी काही अंतर चालणे तसेच काही मिनिटांच्या प्रवासाकरिता चक्क तीन-तीन तास लागत असल्याने महिला व लहान मुले यांचे अतोनात हाल झाल्याचे चित्र या ठिकाणी भेट दिली असता दिसले.

एकीकडे वरसोवा पूल बंद केल्याने ठाण्यात कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे ठाणे आणि कल्याणमध्ये मागील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्याने गणपती विसर्जनाकरिता तात्पुरते टाकलेले डांबर उखडले जाऊन रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मुंब्रा बायपास येथून होणारी वाहतूक सुरळीत होत नसल्याने त्याचा फटका कल्याण-शीळफाटा आणि मुंब्रा बायपास तसेच भिवंडी-मानकोली या परिसरात प्रवास करणाऱ्यांना दिवसभर बसला. येथील वाहतूककोंडीमुळे कल्याण-शीळफाटा, मुंब्रा बायपास, भिवंडी-मानकोली या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांनाही दोन ते तीन तास लागत होते. मुंबई, ठाण्यात १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांच्या प्रवेशास बंदी आहे. त्यांच्या प्रवेशाच्या वेळा निश्चित केलेल्या असतानाही अनेक अवजड वाहने कुठल्याही वेळी रस्त्यावरून जात असल्याचे कसे दिसते, असा सवाल कोंडीत अडकलेल्यांनी केला. कळवा येथील महालक्ष्मी मंदिरापाशी एकाच वेळी पाच पाच वाहतूक पोलीस कोंडाळे करून उभे असल्याचे दिसले. मात्र, ज्या कापूरबावडीपाशी वाहतूककोंडी झाली होती, तेथे वाहतूक पोलीस अभावाने दिसल्याचे काही वाहनचालकांनी निदर्शनास आणले.