शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे दिवसी नगरदेवाचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: July 21, 2016 20:46 IST

गावाची बसफेरी बंद झाल्याने नागरिकांचे व लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांचे झालेले हाल पाहता संतापलेल्या नवरदेवाने गुरुवारी लग्नाच्या दिवसी दुपारी तिवसा तहसीलदारांच्या

तिवसा येथील घटना : गावात बसफेरीची मागणीतिवसा, अमरावती : गावाची बसफेरी बंद झाल्याने नागरिकांचे व लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांचे झालेले हाल पाहता संतापलेल्या नवरदेवाने गुरुवारी लग्नाच्या दिवसी दुपारी तिवसा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले व वणी (ममदापूर) गावात तत्काळ बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. आश्वासनानंतर नवरदेव पुन्हा मंगल कार्यालयात पोहोचला व वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडला.

तिवसा तालुक्यामधील वणी (ममदापूर) या ग्रामपंचायतीचे सदस्य मुकुंद पुनसे यांचे गुरूवारी तिवसा येथील एका मंगल कार्यालयात गुरुवारी लग्न होते. लग्नाचे सोपस्कार आटोपताच गावात बस देखील येत नाही म्हणून संतापलेल्या नवरदेवाने सहकाऱ्यासह दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार राम लंके यांच्या कक्षात ठिय्या दिला. नवरदेवापाठोपाठ वऱ्हाड्यांनी देखील तहसील कार्यालयात गर्दी केली.

वणी या गावातील रस्ते रेती घाटातून होणाऱ्या जड वाहतुकीने खराब झाले आहेत त्यामुळे गावात येणारी बसफेरी महामंडळाद्वारा बंद करण्यात आली. त्यामुळे वणीसह ममदापूर, काटसूर, इसापूर व नमस्कारी या गावातील नागरिक व तिवसा येथील शाळेत येणारे विद्यार्थी यांना पायदळ किंवा अ‍ॅटोने येण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही याचा संताप नवरदेव मुकुंद पुनसे यांना होता व त्यांनी चक्क लग्नाचे दिवसी गावाच्या रस्त्याची दुरूस्ती व बसफेरी सुरू करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार राम लंके यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वणी येथे बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले व वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडला. शासनाने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर ३१ जुलै रोजी रस्ता रोको करणार असल्याची माहिती पुनसे यांनी दिली.