शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्याही मुसक्या आवळू !

By admin | Updated: October 28, 2015 02:54 IST

देवेंद्र फडणवीस : छोटा राजन लवकरच भारताच्या ताब्यात

कवठेमहांकाळ : कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन छोटा राजन याला इंडोनेशियाच्या पोलिसांनी पकडले असून, लवकरच त्याला भारताच्या ताब्यात घेण्यात येईल, तसेच दाऊदच्याही मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जोरदार यंत्रणा राबविली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.मुख्यमंत्री फडणवीस सांगली जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानाला भेट दिली. तेथेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इंडोनिशिया व भारत यांच्यामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा करार झालेला नाही. परंतु उभय देशांमध्ये मैत्रीचे संबंध असल्याने केंद्र सरकारने छोटा राजनला भारताच्या ताब्यात घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच छोटा राजनला केंद्र सरकार ताब्यात घेईल. छोटा राजनवर सर्वप्रथम महाराष्ट्र पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. त्याबाबतचे पुरावे आम्ही देऊ. त्यामुळे त्याला केंद्र सरकारकडून महाराष्ट्र पोलीसच पहिल्यांदा ताब्यात घेतील व त्याने महाराष्ट्रात केलेल्या अनेक गुन्ह्यांची चौकशी केली जाईल.छोटा राजनबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीच्याही मुसक्या आवळल्या जाणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहे. तशी यंत्रणा लावली जात आहे. दाऊदलाही नजीकच्या काळात जेरबंद केले जाईल., असा विशवसही त्यांनी व्यक्त केला.यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, जयसिंगराव शेंडगे, हायूम सावनूरकर आदी उपस्थित होते. एफआरपी एका हप्त्यातच!एफआरपी कायदा राबविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारचे रोखठोक मत मांडले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी कायद्यानुसार एका हप्त्यातच सर्व रक्कम दिली पाहिजे, असे आपल्या सरकारने सर्व कारखान्यांना सांगितले आहे. राज्यातील काही कारखानदार टप्प्या-टप्प्याने एफआरपी देण्याची मुभा मिळावी, अशी सवलत मागत होते. परंतु शेतकऱ्यांवर कसलाही अन्याय होऊ नये, एफआरपी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे.