शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

दाऊदचे घर देणार ग्रामपंचायतीकडे

By admin | Updated: February 24, 2016 01:00 IST

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे मुंबके (ता. खेड) येथील सरकारजमा झालेले घर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पोलिसांनी तसे पत्रच ग्रामपंचायतीला दिले असून

खेड (जि. रत्नागिरी) : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे मुंबके (ता. खेड) येथील सरकारजमा झालेले घर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पोलिसांनी तसे पत्रच ग्रामपंचायतीला दिले असून, त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सरपंच अकबर दुदुके यांनी सांगितले. यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्या घराचा लिलाव होणार असल्याचा विषय म्हणजे वावड्याच ठरल्या आहेत. १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद कासकर यांच्या मालकीच्या बहुतांश सर्वच मालमत्तांवर सरकारने टाच आणली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये दाऊदचा हात असल्याच्या संशयावरून दाऊदचे मुंबके येथील राहते घरदेखील ३५ वर्षांपूर्वी सरकारने ‘सील’ केले आहे. या इमारतीमध्ये अलीकडेच काही महिन्यांपासून अनोळखी, तसेच संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याने पोलिसांनीही या घराकडे गस्त सुरू केली आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी आपल्याला दिल्याचे, गावचे पोलीस पाटील सदानंद महादेव सालेकर यांनी सांगितले.हे घर सरकारच्या ताब्यात जाण्याअगोदर काही वर्षे या इमारतीमध्ये दाऊदची लहान बहीण राहत असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. तिच्या मृत्यूनंतर या घरात न राहण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. दाऊदची मोठी बहीण हसिना पारकर हिचे २०१४ मध्ये निधन झाल्यामुळ दाऊदच्या घरात गेल्या १२ वर्षांत कोणाचेही हितसबंध राहिलेले नाहीत. (प्रतिनिधी)दाऊदच्या या घराचा ताबा घेण्याबाबत पोलिसांनी पत्र लिहून सुचविल्याचे सरपंच अकबर दुदुके यांनी सांगितले. ही इमारत ग्रामपंचायतीने किंवा ग्रामस्थांनी सामाजिक कार्यासाठी वापरावी, असेही सुचविले आहे. यावर ग्रामस्थांचा विचार सुरू आहे.