शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

डाळींसाठी लातुरात ७ ठिकाणी धाडी

By admin | Updated: July 27, 2016 18:54 IST

शासनाने दिलेल्या वेअरहाऊस व मिलमध्ये अपेक्षित माल आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी लातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या

पथकाची कारवाई : पाच वेअरहाऊस व दोन डाळ मिलची तपासणीलातूर : शासनाने दिलेल्या वेअरहाऊस व मिलमध्ये अपेक्षित माल आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी लातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या पथकाने बुधवारी पाच वेअरहाऊस व दोन डाळ मिलवर धाड टाकून उपलब्ध मालाची तपासणी केली. शासनाने २०१० मध्ये सूचित केलेल्या साठवण क्षमतेपर्यंत वेअरहाऊस व डाळ मिलमध्ये मालाची उपलब्धता आहे की नाही, हे पाहण्यासाठी बुधवारी नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या पाच जणांच्या पथकाने सकाळी ९ ते १२ या कालावधीत अचानक वेअरहाऊस व डाळ मिलवर धाड टाकून पाहणी केली. यामध्ये शहरातील कव्हा रोड भागातील माऊली कोल्ड अँड वेअरहाऊसच्या तीन व बुलडाणा अर्बन बँकेच्या नवीन एमआयडीसी भागातील दोन वेअरहाऊसची पाहणी केली तसेच जुन्या एमआयडीसी भागातील कीर्ती डाळ उद्योगची एक डाळ मिल व अमित अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजची एक अशा दोन डाळ मिलची पाहणी करून तेथे उपलब्ध असलेल्या मालाची पाहणी केली. या अचानक केलेल्या पाहणीमुळे अनेक वेअरहाऊस व डाळ मिल धारकांचे धाबे दणाणले आहेत. शासनाच्या आदेशानुसार कारवाईशासनाच्या सूचनेनुसार वेअरहाऊस व डाळ मिल धारकांकडे मालाचा साठा मर्यादित राहावा यासाठी तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार लातूर तहसील अंतर्गत चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात तलाठी दिलीप देवकते, तावशीकर, बोयने, अव्वल कारकून मंजूर पठाण, लिपीक अनिल कचरे यांचा समावेश आहे. या पथकाने दोन दिवसात सात ठिकाणी धाडी टाकून उपलब्ध मालाची तपासणी केली असल्याचे पथक प्रमुखाने सांगितले.