शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेवर दरोडेखोरांचा बलात्कार

By admin | Updated: December 30, 2015 00:45 IST

पाथरी-सेलू रस्त्यावरील बांदरवाडा शिवारात दरोडेखोरांनी तिघांवर शस्त्राने वार करीत तीन दरोडेखोरांनी गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची संतापनजनक घटना घडली.

पाथरी (जि. परभणी) : पाथरी-सेलू रस्त्यावरील बांदरवाडा शिवारात दरोडेखोरांनी तिघांवर शस्त्राने वार करीत तीन दरोडेखोरांनी गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची संतापनजनक घटना घडली. पोलिसांनी अवघ्या पाच तासांत सुनिल शेषराव शिंदे (२२), अनिल उत्तम पवार (१८) व रवि भास्कर पवार (२१, सर्व रा़ सागर कॉलनी, पाथरी) यांना अटक केली. संध्याकाळपर्यंत आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.पाथरी शहरापासून सेलू रस्त्यावर ३ कि़मी़ अंतरावर बांदरवाडा शिवारात आखाड्यावर काही कुटुंब राहतात़ सोमवारी रात्री एका आराखड्यावर दरोडेखोरांनी दगडफेक केली़ प्रतिउत्तरात शेतकऱ्यांनीही जोरदार दगडफेक केल्याने दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला़ त्यानंतर दरोडेखोर अशोक व दामू पितळे यांच्या आखाड्यावर गेले़ तेथे झोपलेल्या सालगड्यास मारहाण करून त्याच्याकडून ५ हजार रुपये व दागिने काढून घेतले़ त्यानंतर दरोडेखोर हम्मु चाऊस यांच्या आखाड्यावर गेले़ येथे रणजीत सखा गायकवाड, शेख अनिस शेख बाबा व सय्यद शहाबुद्दीन स़ बशीर यांच्या कुटुंबातील काही जणांना दरोडेखोरांनी कुऱ्हाड, सत्तूर व लोखंडी पाईपने जबर मारहाण केली़ त्यात अशोक व दामोधर पितळे आणि रणजीत गायकवाड गंभीर जखमी झाले़ त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरोडेखोरांनी बाजूच्या खोलीमध्ये झोपलेल्या पाच महिन्याच्या गर्भवती महिलेला दूरवर नेऊन तिघांनी बलात्कार केला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ शोध पथकाने तातडीने कारवाई करत अवघ्या पाच तासांत तिघांना अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली. (प्रतिनिधी)२३ हजारांची लूट दरोडेखोरांनी तीन आखाड्यांवरील सालगड्यांकडून २२ हजार ८०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व एक मोबाईल असा २३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटला़ पोलिसांनी दरोडेखोरांकडून मोबाईल जप्त केला.