शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
3
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
4
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
5
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
6
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
7
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
10
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
11
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
12
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
13
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
14
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
15
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
16
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
17
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
18
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
19
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

अत्याचारीत मुलीने दिला मुलीला जन्म

By admin | Updated: September 5, 2016 02:45 IST

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीची फसवणूक करून गँगरेप झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

नवी मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीची फसवणूक करून गँगरेप झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने नुकताच मुंबईच्या एका रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. कुटुंबीयांच्या व समाजाच्या भीतीने घडलेल्या प्रसंगाची माहिती तिने लपवली होती. मात्र झालेल्या अत्याचारातून ती गरोदर राहिली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानुसार तब्बल एक वर्षाने गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांपैकी तिघांना अटक केली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी मुंबईची राहणारी एक तरुणी नोकरीच्या शोधात रबाळे एमआयडीसी परिसरात आली होती. त्याठिकाणी तिला भेटलेल्या व्यक्तीने एक मोबाइल नंबर देवून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तरुणीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता तिला एकाने मुंबईतील रेल्वेस्थानकात भेटायला बोलावले व पुन्हा रबाळे एमआयडीसीतील एका घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने फोनवर धमकावून तिला भेटीसाठी बोलावले होते. यावेळी त्याठिकाणी उपस्थित चौघांनी तिच्यावर गँगरेप केला. परंतु धमकावल्यामुळे तसेच समाजाच्या व कुटुंबीयांच्या भीतीने पीडित तरुणीने अत्याचाराबाबत कुणालाही माहिती सांगितली नाही. काही महिन्यांनी गरोदर असल्याचेही तिच्या निदर्शनास आले. घरच्यांना याबाबत उशिराने समजले. दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलीने मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला. यावेळी नवजात मुलीचा पिता कोण? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रुग्णालयाकडून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर तरुणीने घडलेल्या अत्याचाराची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. हा तपास रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाल्यावर गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)>तीन आरोपींना अटकअत्याचारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याचे उपनिरीक्षक प्रदीप सरफरे यांनी सांगितले. गुन्ह्यातील अद्याप एक जण फरार असून त्याचाही शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले. तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.