शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर मध्ये दत्त कृपा धाब्यावर दरड कोसळून १ ठार

By admin | Updated: August 2, 2016 15:56 IST

पोलादपूर मधील कशेडी घाट प्रारंभा जवळच्या चोळई गावांतील श्री दत्त प्रसाद ढाब्यावर दरड कोसळून ढाब्याचे मालक उदय चिकणो ठार झाले

जयंत धुळप
ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. २ - पोलादपूर मधील कशेडी घाट प्रारंभा जवळच्या चोळई गावांतील श्री दत्त प्रसाद ढाब्यावर दरड कोसळून ढाब्याचे मालक उदय चिकणो ठार झाले असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सुत्रंनी दिली आहे.
गेल्या चोविस तासात महाबळेश्वर मध्ये 319 मिमी तर महाबळेश्वच्या पायथ्याशीच असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे 256 मिमी तर महाड येथे 230 मिमी अशा विक्रमी पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या सावित्री नदिने महाड मध्ये धोकादायक जलपातळी ओलांडून पूराचे पाणी महाड बाजारपेठ व परिसरात घुसले आहे.
 
समुद्र भरतीमूळे जलपातळीत खाली येण्यास विलंब
महाबळेश्वर सह पोलादपूर व महाड मध्ये संततधार पाऊस सुरच असल्याने सावित्रि नदिची जल पातळी सातत्याने वाढत आहे. सावित्री नदिची धोकादायक पूर पातळी 6.50 मिटर असून सद्यस्थितीत सावित्रीची प्रत्यक्ष जलपातळी महाड येथे 6.30 मिटर झाली आहे. मंगळवारी अमावास्या असून समुद्रास पूर्ण भरती 11.15 वाजता होती त्यामूळे पश्चिम वाहीनी नद्यांच्या पूराच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे वेगाने होवू शकत नव्हता. ओहोटी सुरु झाल्यावर नद्यांची जलपातळी कमी येवू शकेल असा अंदाज महाड-पोलादपूरच्या पूर्वीच्या पूरापत्तीत मदत कार्यकेलेले अनूभवी एमएमएचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
 
सावित्री नदीबरोबरच जिल्ह्यातील उवर्रित नद्यांच्या जलपातळीत वाढ 
महाडमधील सावित्री नदि बरोबरच जिल्ह्यातील उवर्रित नद्यांच्या जलपातळीत देखील विक्रमी वाढ झाली आहे. अंबा नदिची नागोठणे येथे जलपातळी 6 मिटर (धोकादायक पूर पातळी 9 मि.) झाली आहे. कुंडलिका नदिची डोलवहाळ येते जलपातळी 23 मिटर (धोकादायक पूर पातळी 23.95मि.) झाली आहे. पाताळगंगा नदिची लोहोप येथे जलपातळी 18.92 मिटर (धोकादायक पूर पातळी 21.52मि.) झाली आहे. उल्हास नदिची कजर्त येथे जलपातळी 43 मिटर (धोकादायक पूर पातळी 48.77मि.) झाली आहे. गाढी नदिची पनवेल येथे जलपातळी 3 मिटर (धोकादायक पूर पातळी 6.55मि.) झाली आहे.
 
भिरा धरणाचे तिन दरवाजे 0.25 सेमी उघडले, 83.20 क्युसेक्स जल विसर्ग सूरु 
भिरा धरण क्षेत्रत गेल्या चोविस तासात 149.40 मिमी पाऊस झाला तर यंदाच्या पावसाळ्य़ात मंगळवारी सकाळी आठ वाजे र्पयत येथे एकुण 2842.2क् मिमी पाऊस झाल्याने भिरा पिकअप धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील जलपातळी धोक्याच्या खाली राखण्याकरीता धरणाचे तिनही दरवाजे क्.25 सेमी उघडण्यात आले असून त्यांतून सद्यस्थितीत 83.2क् क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. या जलविसर्गामूळे कुंडलिका नदीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. परिणामी रोहा अष्टमी पूलास कुंडलिका नदिचे पाणी पोहोचले आहे.  रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती नियंत्रणाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
 
रायगड जिल्ह्यातील पजर्न्यमान
पोलादपूर-256 मि.मि.,महाड-230 मि.मि.,  मुरु ड-122 मि.मि.,  कर्जत-96.80 मि.मि., पेण-64 मि.मि.,अलिबाग-63 मि.मि.,  पनवेल43.20 मि.मि., उरण-32 मि.मि., खालापूर-74 मि.मि., माणगांव-194 मि.मि., रोहा-142 मि.मि., सुधागड पाली-129 मि.मि., तळा-140 मि.मि.,   म्हसळा-181.60 मि.मि., श्रीवर्धन-133 मि.मि., माथेरान-43 मि.मि. जिल्ह्यात एकूण 1943.6मि.मि.पाऊस पडला असून हे सरासरी  पजर्न्यमान 121.48 मि.मि. आहे.