शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दराडे यांना मिळाला नैसर्गिक न्याय

By admin | Updated: November 2, 2014 01:00 IST

नागपूर मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात निर्माण झालेल्या राजकीय वादंगात निष्कारण बळी ठरलेले नागपूर सुधार प्रन्यासचे तत्कालीन सभापती प्रवीण दराडे यांची आज शनिवारी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती

मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती नागपूर : नागपूर मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात निर्माण झालेल्या राजकीय वादंगात निष्कारण बळी ठरलेले नागपूर सुधार प्रन्यासचे तत्कालीन सभापती प्रवीण दराडे यांची आज शनिवारी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती होताच एका चांगल्या अधिकाऱ्याला नैसर्गिक न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया उपराजधानीत उमटली. नागपुरात जिल्हाधिकारी आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणून प्रवीण दराडे यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली. एक प्रामाणिक सचोटीचा आणि लोकांची कामे करणारा अधिकारी म्हणून दराडे नागपुरात लोकप्रिय होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवसांपूर्वी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, वेंकय्या नायडू आदींसह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा येणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करतात, अशी टीका करीत त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातल्याने काँग्रेसचे कुठलेच नेते कार्यक्रमाकडे फिरकले नाही, असे असतानाही हा भव्य कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. अतिशय अल्पकाळात या समारंभाची नियोजनबद्ध आखणी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दराडे यांची जाहीरपणे प्रशंसा केली होती. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्र्यांना रुचली नाही. त्यामुळे नाराज होऊन राज्य सरकारने त्यांची चार दिवसानंतर तडकाफडकी पुण्यात बदली केली होती. याची तीव्र प्रतिक्रिया जनमानसात तेव्हा उमटली होती. अनेकांना वाईटही वाटले होते. बदलीचा विरोधही करण्यात आला होता. राजकीय वैमन्यस्यातून दराडे यांची बदली झाल्याची टीका भाजपाने जाहीरपणे केली होती. प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा तेव्हा हा विषय लावून धरला होता. महाराष्ट्रात युतीची सत्ता आल्यास दराडे यांचे पुनर्वसन केले जाईल, असे कयास तेव्हाच लावले जात होते. योगायोगाने महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली आणि नागपूरचेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. अखेर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले सचिव म्हणून प्रवीण दराडे यांची नियुक्ती करताच त्यांना नैसर्गिक न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया उमटली. मेट्रोच्या उभारणीसाठी दराडे यांनी जे अथक परिश्रम घेतले, त्याचे फळही त्यांना मिळाले. (प्रतिनिधी)