शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिघीत ४० वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी ठरतेय धोकादायक

By admin | Updated: January 16, 2017 01:50 IST

ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली

दिघी : ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकीशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, संबंधित प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहणार आहे का, असा सवाल केला आहे. १९७८ मध्ये दिघीतील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. या टाकीची एक लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता होती. अंदाजे तीस वर्षे अविरत सेवा करून शेवटी या टाकीची झीज होण्यास सुरुवात झाली. कालांतराने धोकादायक ठरू पाहणा-या टाकीतील पाणीपुरवठा साठवणे बंद करून टाकी मोकळी करण्यात आली. दरम्यान दिघी गावचा पालिकेत समावेश झाल्यानंतर टाकी पाडण्यासंदर्भात ठराव केला. मात्र प्रत्येक वेळी आयुक्त व प्रशासकीय अधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतरसुद्धा टाकी पाडण्याविषयी कुठलीही कारवाई झाली नाही. उलट वर्षानुवर्षे जाऊन ४० वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. ऊन व पावसाच्या तडाख्याने टाकीची अवस्था मोडकळीस आलेली आहे. मुख्य चार कॉलमची झीज होऊन भरमसाठ वजन पेलण्याची क्षमता नसून, आतील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. (वार्ताहर)>दिघी गावठाणातील पालिकेच्या शाळेजवळच ही धोकादायक टाकी उभी आहे. टाकीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, स्थानिक रहिवाशांची लहान मुले येथे खेळताना दिसतात. टाकीची अवस्था लक्षात घेता ती कधी कोसळून पडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टाकीच्या बाजूला असलेले विजेचे उघडे तार तुटून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कधी काळी जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी उद्या दिघीकरांचा काळ ठरणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधित प्रशासनाने पाण्याची टाकी पाडण्याची मागणी केली आहे.