शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणे भरू लागली

By admin | Updated: August 1, 2016 04:35 IST

जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली

मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आल्याने पिकांचीही चांगली वाढ होणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही धरणसाठ्यात वाढ होत असून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रकल्पांत दोन दिवसांत जलसाठा वाढला आहे. मराठवाड्यात मात्र अजून धरण साठ्यात मोठी वाढ झालेली नाही. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत मराठवाड्यातील जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल. नागपूर विभागातील मोठे प्रकल्प ५७ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. तसेच मध्यम प्रकल्पात ६२ टक्क्यांपर्यंत तर लघु प्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा झाला आहे. अप्परवर्धा जलाशयाच्या पातळीत वाढ झाल्याने रविवारी सायंकाळी तीन दरवाजे उघडून ५० घनमीटर प्रती सेकंदनुसार पाणी सोडण्यात आले. उजनीत वाढसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे़ ते आता उणे २८ टक्क्यांवर आले आहे़ दौंडमधून ८६५ क्युसेक्सआणि बंडगार्डनमधून २,९१६ क्युसेक्स विसर्ग धरणात येत आहे़ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९१ टक्के भरले असले तरी २५.३९२ टीएमसीचे काळम्मावाडी (दूधगंगा) धरण अद्याप ५४ टक्केच भरले आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सध्या ५८.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>जायकवाडी मृतसाठ्यातच जायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. पाणीपातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. गेल्या महिनाभरात जायकवाडी धरणात २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.