शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंवर ‘दामिनीं’ची नजर

By admin | Updated: September 10, 2016 00:55 IST

गणेशोत्सवकाळामध्ये महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या, तसेच त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या ६९ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली

पुणे : गणेशोत्सवकाळामध्ये महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या, तसेच त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या ६९ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या दामिनी स्क्वाडच्या माध्यमातून गस्त वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. उत्सवकाळात महिलांची छेडछाड होणार नाही, टिंगलटवाळीच्या घटनांना आळा घालण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिल्या आहेत. महिलांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होण्यासाठी बुधवार आणि गुरुवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ६९ व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विश्रामबाग, फरासखाना, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा, खडकी, पिंपरी, निगडी, चिंचवड, स्वारगेट, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. दामिनी पथकांमार्फतही शहरात सर्वत्र गस्त सुरू आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालून या प्रकारांवर लक्ष ठेवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>गावठी पिस्तुल जप्तयेरवड्यातील आयबीएम कंपनीच्या पाठीमागील बाजूस कारवाई करीत पोलिसांनी सुमीत मनोहर कांबळे (वय २५, रा. गंज पेठ) याला पकडले आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉजची झाली तपासणीगेल्या दोन दिवसांत संशयितरीत्या फिरताना आढळलेल्या ६ जणांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. यासोबतच शहरातील तब्बल ३६ लॉज तपासण्यात आले असून ३९ गुन्हेगारांना तपासण्यात आले आहे. येरवड्यातील कोंबिंग आॅपरेशनदरम्यान मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आशुतोष सुभाष अडागळे, दीपक दत्तात्रय मदने या दोघांना पकडण्यात आले.