शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

दलितांनी संघटित राहण्याची गरज

By admin | Updated: July 10, 2014 00:00 IST

राजकीय आणि सामाजिक यश मिळविण्यासाठी दलितांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

पुणो : नामदेव ढसाळ यांनी जीवनाच्या अखेरीर्पयत लढाऊ बाणा सोडला नाही. दलित पँथरनेही हा बाणा यापुढे जोपासावा. राजकीय आणि सामाजिक यश मिळविण्यासाठी दलितांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. 
दलित पँथरच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एस. डी. पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, आमदार जयदेव गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणो, बाळासाहेब कडलग उपस्थित होते. 
पाटील म्हणाले, ‘‘नामदेव ढसाळ हीच दलित पँथरची ओळख होती. ते आयुष्यभर दलितांच्या प्रगतीसाठी वाघासारखे लढले. या समाजामध्ये त्यांनी वेगळेच स्फुल्लिंग चेतविले होते. ती लढाऊवृत्ती पँथरने यापुढेही जपली पाहिजे. संघटना आणि नवा विचार त्यांनी निर्माण केला. त्याच्याशी सत्तेसाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही. प्रत्यक्ष कृतीतून ते दलितांच्या पाठीशी उभे राहिले. विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पँथरला बरोबर घेऊन निवडणूक लढू.’’
सोनवणो म्हणाले, ‘‘शिवशक्ती-भिमशक्तीमध्ये आमची उपेक्षा झाली. आमचे प्रश्न त्यांना सोडविता आले नाहीत. काँग्रेसला आमची व्यथा समजली नाही. त्यामुळे या दोन्हीपासून आम्ही दूर झालो. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी समाज विकायला काढला.’’ भगव्याने आमची अनेक आंदोलने मोडून काढली, अशा वेळी आमचा नेता मंत्रिपदाच्या मागे पळत आहे,’’ अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
 
अर्थसंकल्पावर टीका
4जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पावर टीका केली. ते म्हणाले, की रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये गरिबांचा विचार केलेला नाही. उद्या होणा:या अर्थसंकल्पातही वरवर पाहता अनेक चांगल्या योजना असतील. मात्र, त्याबरोबरच सर्वसामान्यांच्या खिशालाही चिमटा काढलेला असेल. पंतप्रधानांच्या योजनांचे सादरीकरण चांगले असते, मात्र त्यामागील खरे गणित सर्वसामान्यांना पचविता येणारे नसते.