शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दलित समाजाची न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 03:27 IST

दलित मुलाने मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने नाशिकमध्ये तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेने नाशिकमध्ये हिंसक वळण

मुंबई : दलित मुलाने मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने नाशिकमध्ये तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले; तर दुसरीकडे दलितांवर मराठा समाजाकडून अत्याचार करण्यात येत असल्याने व त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घातल्याने दलित वर्गातील दोघांनी थेट उच्च न्यायालयाची पायरी गाठली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली त्याच दिवशी ५० जणांच्या जमावाने सांजेगाव येथील दलितांच्या १५ घरांवर हल्ला केला. जो सापडेल त्याला मारहाण केली तर महिलांचा विनयभंग केला, असा आरोप नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील सांजेगावची रहिवासी बेबीबाई शिंदे (५०) आणि साहेबराव पवार (३०) यांनी याचिकेद्वारे केला आहे. या हल्ल्यात बेबीबाई यांची मुले शिवाजी आणि विजय गंभीररीत्या जखमी झाले. दोघेही कोमामध्ये असून, शिवाजीला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर विजय नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहे. या जमावाने सांजेगाव येथील बौद्धविहाराचीही तोडफोड केली. या घटनेची पोलिसांनी अद्याप दखल घेतलेली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.‘त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनंतर अनुसूचित जाती व जमातीच्या समाजावर पूर्णपणे सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करून दिला जात नाही तसेच पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. मुलांनाही शाळा सोडून घरी बसावे लागत आहे,’ असे याचिकाकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. ‘पोलिसांकडून साहाय्य मिळावे यासाठी बेबीबाई शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकार महिलेचा फोन वापरून महासंचालक सतीश माथूर यांना फोन केला. मात्र माथूर यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्या वेळी कार्यालय बंद असल्याचे कारण पुढे केले. त्यावर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागू, असे माथूर यांना सांगितले. माथूर यांनी त्यांना उच्च न्यायालयात भेटू, असे सांगितले,’ असेही अ‍ॅड. सदावर्ते यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांना याबाबतीत सूचना घेण्याचे निर्देश दिले. त्र्यंबेकश्वर येथे ९ आॅक्टोबर रोजी एका पाच वर्षीय मराठा मुलीवर दलित मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी दलित वस्तीवर हल्ला करण्यात आला. (प्रतिनिधी)