शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू-बोर्डी मार्ग विसर्जनास धोक्याचा

By admin | Updated: September 10, 2016 02:50 IST

डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्ग खड्डेमय झाल्याने डांबरी रस्त्यावर दगडमातीचा भराव टाकण्यात आला.

डहाणू/बोर्डी : डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्ग खड्डेमय झाल्याने डांबरी रस्त्यावर दगडमातीचा भराव टाकण्यात आला. मात्र, अवजड वाहतूक आणि पावसाच्या पाण्यामुळे मार्गावर चिखल पसरला आहे. त्यामुळे पाच दिवसांचे व दहा दिवसांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूक निघाल्यावर या निसरड्या रस्त्याचे विघ्न असून अपघात टाळणे गणेशभक्तांसाठी आव्हान बनले आहे. दरम्यान, मूर्तीला धोका पोहोचल्यास या प्रकाराने धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येत्या शनिवारी व गुरुवारी पाच व दहा दिवसांच्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक आहे. त्यामुळे डहाणू फोर्ट येथील मूर्तींची या मार्गावर रीघ लागेल. डहाणू-बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाची चाळण झाली आहे. अनेक वर्षांपासून निधी मंजूर न झाल्याने रस्त्याचे विकासकाम हाती घेतलेले नाही. त्यामुळे रस्ता खड्डेमय बनला आहे. उत्सवाच्या अनुषंगाने लोकांचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांना दगड, मातीचा भराव घालून तात्पुरती डागडुजी केली. मात्र, मार्गावरील अव्याहत अवजड वाहतुकीमुळे भराव निघून गेला. शिवाय, पावसामुळे मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरून रस्ता निसरडा बनला आहे. (वार्ताहर)>पोलीस कारवाई करीत नाहीत वाहतूककोंडी आणि धोकादायक मार्गामुळे अपघाताची शक्यता बळावळी आहे. घोलवड आणि डहाणू पोलीस अवजड व अवैध वाहतुकीवर कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दरम्यान, निसरड्या रस्त्यांवरून वाहनांना अपघात होत असल्याने विसर्जनादरम्यान गणेशमूर्तीं घेऊन जाताना खड्ड्यांचे विघ्न येण्याची भीती गणेशभक्तांना सतावत आहे. गणेशमूर्तींची वाहतूक करणे भक्तांकरिता आव्हान ठरले आहे. दुर्दैवाने अपघात घडून मूर्तीला अपाय झाल्यास धार्मिक भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.