शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरे प्रकरणाचा तपास एकांगी - सनातन

By admin | Updated: November 27, 2015 02:51 IST

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यंत्रणा दाभोलकर आणि पानसरे हत्येचा तपास एकांगी आणि खोट्या सिद्धान्तावर करत आहे

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यंत्रणा दाभोलकर आणि पानसरे हत्येचा तपास एकांगी आणि खोट्या सिद्धान्तावर करत आहे, असा आरोप सनातन संस्थेने गुरुवारी केला. सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर सनातनच्या साधकांना या प्रकरणात गोवत असल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणीही सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी या वेळी केली आहे.वर्तक म्हणाले की, सनातनचे साधक हेमंत शिंदे, नीलेश शिंदे, नीरज येनगूल, महेंद्र सहस्रबुद्धे, यशवंत सहस्रबुद्धे, गजानन केसरकर, कृष्णा कुंभार या साधकांच्या मोबाइल क्रमाकांच्या रोमिंग पॅटर्नवर हा तपास सुरू आहे. पहाटे व्यामशाळेत जाणारा, वर्तमानपत्राचे वितरण करणाऱ्या साधकांच्या मोबाइलचे रोमिंग पॅटर्न चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा सीबीआयचा प्रयत्न सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी सीबीआय सनातनच्या साधकांना खुनी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव व अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केला. पुनाळेकर म्हणाले की, केवळ एक दिवसाचे रोमिंग दाखवणारे नायर खुनाच्या आदल्या आणि खुनानंतरचे रोमिंग न्यायालयापासून लपवत ठेवत आहेत. परिणामी, नायर यांच्या वर्तनाविषयी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. चौकशी होईपर्यंत नायर यांना निलंबित करून त्यांचे भूतकाळातील वर्तन तपासावे. शिवाय त्यांना सेवामुक्त करून तुरुंगात पाठवण्याची मागणीही सनातनने एका पत्राद्वारे सीबीआयचे दिल्ली कार्यालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.