शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळ प्रकल्पातून रेल्वेला मिळणार वीज

By admin | Updated: November 21, 2015 02:43 IST

रेल्वेला लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रत्नागिरीतील दाभोळ वीज प्रकल्पाचा आधार घेतला आहे. या प्रकल्पातून रेल्वेला पुढील आठवड्यापासून वीजपुरवठ्याला

मुंबई : रेल्वेला लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रत्नागिरीतील दाभोळ वीज प्रकल्पाचा आधार घेतला आहे. या प्रकल्पातून रेल्वेला पुढील आठवड्यापासून वीजपुरवठ्याला सुरुवात होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पवन ऊर्जा - रेल्वे सेक्टरमध्ये संधी’ या विषयावर वाय.बी. चव्हाण सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रभू यांनी रेल भवन येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिसंवादात सहभाग घेतला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या परिसंवादात रेल्वे बोर्डाचे सदस्य (इलेक्ट्रीकल) नवीन टंडन, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. रेल्वे बोर्डाचे सदस्य (इलेक्ट्रीकल) नवीन टंडन यांनी पुढील पाच वर्षांत एक हजार मेगावॅट वीज सौरऊर्जा व पवनऊर्जेतून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. मुंबईतील रेल्वे स्थानकांनाही असणारी विजेची गरज पाहता सोलार पॅनलचा आधार घेण्यात येणार आहे. त्यासाठी उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या छतावर आणि इमारतींवर सोलार पॅनल बसविण्यात येईल. यातून वीज निर्माण केली जाणार असल्याची माहिती टंडन यांनी या वेळी दिली. चर्चगेट स्थानकाच्या छपरावर लवकरच येत्या काळात सोलार पॅनल बसविण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)प्रभू म्हणाले...रेल्वेची विजेची गरज भविष्यात वाढू शकते. त्यामुळे सौरऊर्जा व पवनऊर्जेतून जास्तीतजास्त वीज निर्मिती करणे आवश्यक असून, तसे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या खासगी वीज कंपन्यांकडून ज्या दराने वीज मिळते त्यापेक्षा अर्ध्या दराने दाभोळ प्रकल्पातून वीज मिळेल आणि पुढील आठवड्यापासून त्याचा पुरवठा सुरू होईल.