शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळच्या विजेवर रेल्वेची झुकझुक!

By admin | Updated: November 27, 2015 03:40 IST

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळपासून वीजनिर्मितीस सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता ३०० मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला.

मुंबई/गुहागर : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळपासून वीजनिर्मितीस सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता ३०० मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला. ही वीज महाराष्ट्रातील रेल्वेसेवेला पुरविण्यात येत आहे.कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात असलेला २१५० मेगावॅट क्षमतेचा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ आॅक्टोबर २००५ रोजी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प नावाने प्रकल्प सुरू झाला. अनेक वर्षे प्रकल्प बंद असल्याने वीजनिर्मिती सुरू करण्यात अनेक अडचणी आल्या. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर प्रकल्पातून सरासरी १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. अपुऱ्या गॅसपुरवठ्यामुळे अखेर डिसेंबर २०१३पासून वीजनिर्मिती बंद करण्यात आली.केंद्र व राज्यातील सत्ताबदलानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी हा प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. ५०० मेगावॅट वीज खरेदी करण्याला रेल्वेकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने वीजनिर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्याच्या ९ रुपये प्रति युनिट दराच्या तुलनेत अडीच ते साडेतीन रुपये दराने दाभोळ प्रकल्पातून वीज मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेची दरवर्षी ५00 ते ७00 कोटींची बचत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.या प्रकल्पातून महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या ३६, पश्चिम रेल्वेच्या ६, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ४ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या एका ट्रॅक्शन सब स्टेशनला वीज मिळेल. दाभोळ प्रकल्पातून रेल्वेला व्यवस्थित वीजपुरवठा व्हावा यासाठी सीएसटी येथे ‘स्पेशल एनर्जी सेल’ स्थापन करण्यात आला आहे. हा सेल २४ तास कार्यरत असेल.