शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्सुकता शिगेला..!

By admin | Updated: May 16, 2014 04:16 IST

पुणे, बारामती, शिरूर व मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या (शुक्रवारी) लागणार आहे. चारही मतदारसंघांत चुरशीची लढत असून, आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुणे : जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर व मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या (शुक्रवारी) लागणार आहे. चारही मतदारसंघांत चुरशीची लढत असून, आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात २९ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजित कदम, मनसेचे दीपक पायगुडे व आम आदमी पक्षाचे सुभाष वारे यांच्यात चुरशीची चौरंगी लढत झाली. त्यापैकी कोणाच्या गळ्यात पुण्यातील खासदारकीची माळ पडणार, याची उत्सुकता पुणेकरांना आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. त्याठिकाणी महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, ‘आप’कडून निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे व बहुजन समाज पक्षाकडून काळुराम चौधरी यांनी निवडणूक लढविली आहे. सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळ ठोकला होता. तर, जानकर यांच्यासाठी मुंडे यांनी सभा घेतली. त्याठिकाणी महायुतीचे उमेदवार जानकर खाते उघडणार, की पुन्हा सुळे यांनाच खासदारकी मिळणार, याविषयी उत्सुकता आहे. मावळ लोकसभेचे खासदार गजानन बाबर यांना उमेदवारी डावलल्याने, त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला. जगताप यांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीने शिवसेनेतून आलेले राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. महायुतीतर्फे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर, ‘आप’कडून मारुती भापकर यांनी निवडणूक लढविली. नार्वेकरांसाठी शरद पवार व अजित पवार, जगताप यांच्यासाठी राज ठाकरे व श्रीरंग बारणे यांच्यासाठी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या दिग्ग्जांनी हजेरी लावली. शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, राष्ट्रवादीचे देवदत्त निकम व मनसेचे अशोक खांडेभराड यांच्यात थेट लढत आहे. आढळराव यांना हॅट्ट्रिकची उत्सुकता आहे. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली, तर निकम यांच्यासाठी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली आहे. खांडेभराड यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली. ‘आप’कडून सोपानराव निकम यांनी निवडणूक लढविली असली, तरी आढळराव व निकम यांच्यात कोणाला विजयश्री मिळते, याची उत्सुकता आहे. व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुक या सोशल नेटवर्कवर अभिनंदनाचा वर्षाव करीत आनंद सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन केले जात आहे.