शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांची संचारबंदी शिथिल

By admin | Updated: October 16, 2016 02:29 IST

तळेगाव येथील घटनेनंतर तणाव निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सात गावांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलीस व राज्य राखीव दलाचा बंदोबस्त

नाशिक : तळेगाव येथील घटनेनंतर तणाव निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सात गावांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलीस व राज्य राखीव दलाचा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. रविवारच्या जाळपोळ, दगडफेक व लुटालुटीच्या घटनेनंतर, इगतपुरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आठ गावांमध्ये सोमवारपासून संचारबंदी जारी करण्यात आली होती. समाजकंटकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर दगडफेक करत, वाहने पेटवून दिली होती. ग्रामीण भागात रहिवाशांवरही हल्ले झाले. त्यामुळे पोलिसांना लाठीमार, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तर पाडळी येथे जमाव नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबाराच्या फैरीही झाडाव्या लागल्या. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच, विल्होळी, वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, शेवगेडांग, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव, तळवाडे या गावांमध्ये सलग ७२ तास संचारबंदी जारी करण्यात आली होती. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नसली, तरी खबरदारी म्हणून शुक्रवारी मुदत संपल्यानंतरही पोलीस व प्रशासनाने संचारबंदीत पुन्हा २४ तासांनी वाढ केली होती. त्याची मुदत शनिवारी दुपारी संपल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले.शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव व तळवाडे या सहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारी परिस्थिती पाहून संचारबंदी वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)