शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

प्रस्थापितांना हादरा, नव्या चेहऱ्यांचा शोध

By admin | Updated: October 17, 2016 01:47 IST

महापालिका २०१७च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

टीम लोकमत,मुंबई- महापालिका २०१७च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नव्या प्रभागरचनेमुळे दिग्गजांची दांडी गुल झाली आहे. शहरातून उपनगरात स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमुळे शहरातील प्रभाग कमी होऊन उपनगरात प्रभागांचा भरणा अधिक झाला आहे. विशेषत: नव्या प्रभाग रचनेचा फटका विद्यमान नगरसेवकांना अधिक बसला आहे. वॉर्डातील अर्ध्या नगरसेवकांच्या स्वप्नावर आरक्षणामुळे पाणी फेरले जाणार आहे. एकंदर महापालिकेच्या निवडणुकीला दोनएक महिन्यांचाच कालावधी शिल्लक असतानाच आता प्रत्येक राजकीय पक्षातल्या दावेदारांसह उत्सुक असलेल्या उमेदवारांनी छुप्या खेळी खेळत पक्षश्रेष्ठींचा वरदहस्त मिळवण्यासह जनसंपर्कावर भर दिला आहे. असेच काहीसे भारावलेले आणि औत्सुक्याचे चित्र मुंबापुरीतल्या प्रत्येक वॉर्डातल्या प्रभागात रंगले आहे. ‘एल’ वॉर्डमध्ये एकूण १६ प्रभाग आहेत. या वॉर्डात गत महापालिका निवडणुकीत मनसेचे दिलीप लांडे, ईश्वर तायडे, शिवसेनेच्या कोमल जामसांडेकर, मनाली तुळसकर, संजना मुणगेकर, अनुराध पेडणेकर, दर्शना शिंदे, राष्ट्रवादीच्या सईदा खान, सविता पवार आणि अपक्ष म्हणून लीना शुक्ला, ललिता अन्नामलाई, विजय तांडेल अशा दिग्गज उमेदवारांनी विजय मिळवला होता. आता यापैकी अनेकांनी पक्षांतर केले आहे. काही पक्षांतराच्या मार्गावर आहेत. तर नव्या प्रभाग रचनेचा काहींना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या गतनिवडणुकीत भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होती. परिणामी, या युतीने अनेकांना धूळ चारली होती. मात्र विधानसभेला या दोन्ही युती तुटल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘एल’ वॉर्डातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या दावेदारांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. >येत्या महापालिका निवडणुकीत एल वॉर्डमधील काही इच्छुक उमेदवार पक्षांतराच्या मार्गावर आहेत. तर नव्या प्रभाग रचनेचा काहींना मोठा फटका बसला आहे. >गत महापालिकेच्या निवडणुकीत एल वॉर्डमध्ये शिवसेनेच्या पाच उमेदवारांनी बाजी मारली होती, तर खालोखाल सपाचे उमेदवार होते; शिवाय राष्ट्रवादीसह मनसेनेही येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. पाच वर्षांत येथे पक्षांतरासह विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. नव्या आणि जुन्यांमध्ये दरी पडण्यासह आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.प्रभाग क्रमांक १५६एकूण लोकसंख्या ६०,६८५अनुसूचित जाती ४,६७१अनुसूचित जमाती १,०२५प्रभागाची व्याप्ती : तुंगा व्हिलेज, उद्यान कॉम्प्लेक्स, सावरकरनगर, साकीविहार, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनी प्रभाग क्रमांक १५७ एकूण लोकसंख्या ५७,२३३अनुसूचित जाती ४,९३८अनुसूचित जमाती ३४९प्रभागाची व्याप्ती : रहेजा विहार, म्हाडा कॉलनी, संघर्षनगर, बिग पार्क, चांदिवली स्टुडिओ, चांदिवली लेकप्रभाग क्रमांक १५८एकूण लोकसंख्या ५६,८७८अनुसूचित जाती २,५८६अनुसूचित जमाती ३४०प्रभागाची व्याप्ती : यादवनगर, म्हाडा कॉलनी, टिळकनगर, म्हाडा मैदानप्रभाग क्रमांक १५९एकूण लोकसंख्या ५४,७३९अनुसूचित जाती १,५५१अनुसूचित जमाती २४४प्रभागाची व्याप्ती : यादवनगर, असल्फा, मोहिली, सुभाषनगर, शिवप्रेमीनगर, आझादनगरप्रभाग क्रमांक १६०एकूण लोकसंख्या ५२,८०२अनुसूचित जाती ३,४७७अनुसूचित जमाती २१३प्रभागाची व्याप्ती : मिलिंदनगर, भीमनगर, नारायणनगर, होमगार्ड ट्रेनिंग सेंटर प्रभाग क्रमांक १६१एकूण लोकसंख्या ५७,७४१अनुसूचित जाती ३,0८२अनुसूचित जमाती २१५प्रभागाची व्याप्ती : लोकमान्य टिळकनगर, कृष्णनगर, वीर सावरकरनगर, नेताजीनगर, लाल बहादूर शास्त्री नगरप्रभाग क्रमांक १६२एकूण लोकसंख्या ५४,९८९अनुसूचित जाती २,१५९अनुसूचित जमाती ३२३प्रभागाची व्याप्ती : शिवाजीनगर, साथी डिसोजानगर, स्पेंटा रेसिडेन्सी पार्क, एअरपोर्ट रनवेप्रभाग क्रमांक १६३एकूण लोकसंख्या ५४,३६५अनुसूचित जाती ४,६४५अनुसूचित जमाती १६५प्रभागाची व्याप्ती : काजूपाडा, इंदिरानगर, परेरावाडी, मे. आर. इंडस्ट्रीयल एरिया, साकीनाकाप्रभाग क्रमांक १६४एकूण लोकसंख्या ५७,३३0अनुसूचित जाती ४,७४३अनुसूचित जमाती २८१प्रभागाची व्याप्ती : प्रीमिअर रेसिडन्सी, संजयनगर, अशोकनगर, कमानी, प्रीमिअर कॉलनी, नवपाडाप्रभाग क्रमांक १६५एकूण लोकसंख्या ५८,०४०अनुसूचित जाती २,४४२अनुसूचित जमाती २९३प्रभागाची व्याप्ती : ख्रिश्चन गाव, जय अंबिकानगर, भारतीयानगर, हलावपूल, कोहिनूर रुग्णालयप्रभाग क्रमांक १६६एकूण लोकसंख्या ५६,६२१अनुसूचित जाती ४,९६६अनुसूचित जमाती ७९४प्रभागाची व्याप्ती : क्रांतीनगर, संदेशनगर, वाडिया कॉलनी, किस्मतनगर, शांतीनगर, छत्रपती शिवाजी तलाव, बैलबाजार, कुर्ला बस डेपोप्रभाग क्रमांक १६७लोकसंख्या ५७,३२४अनुसूचित जाती १,९८५अनुसूचित जमाती ३१७प्रभागाची व्याप्ती : विनोबा भावे नगर, बुद्ध कॉलनी, ब्राह्मणवाडी, कुर्ला ‘एल’ विभाग कार्यालयप्रभाग क्रमांक १६८एकूण लोकसंख्या ५५,७०७अनुसूचित जाती ४,३७४अनुसूचित जमाती २७६प्रभागाची व्याप्ती : कल्पनानगर, टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्रनगर, कुर्ला मेट्रोपॉलिटेन कोर्ट, भाभा रुग्णालयप्रभाग क्रमांक १६९एकूण लोकसंख्या ५८,२६९अनुसूचित जाती ७,६३७अनुसूचित जमाती ४००प्रभागाची व्याप्ती : नेहरूनगर, कामगारनगर, शिवशक्तीनगर, कुर्ला मदर डेअरीप्रभाग क्रमांक १७०एकूण लोकसंख्या ५३,५९८अनुसूचित जाती २,२१८अनुसूचित जमाती १९३प्रभागाची व्याप्ती : कुरेशीनगर, तक्षशिलानगर, राहुलनगर, जी.टी.बी. नगर, एव्हाराडनगर, मराठी विज्ञान परिषदप्रभाग क्रमांक १७१एकूण लोकसंख्या ५२,७३१अनुसूचित जाती ३,०५३अनुसूचित जमाती २०१प्रभागाची व्याप्ती : म्हाडा कॉलनी, प्रेमनगर, ताडवाडी, चुनाभट्टी म्युनिसिपल रुग्णालय>२०१२मधील एल वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारांची माहिती वॉर्ड क्र. विजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवारप्राप्त मते१५0सविता पवार (एनसीपी)१०,०५८अश्विनी माटेकर (मनसे)६०१४१५१ईश्वर तायडे (मनसे)८,८३४चित्रा सांगळे (शिवसेना)८२४९१५२कोमल जामसांडेकर (शिवसेना)५,२८६उषा मोरे (अपक्ष)३,९७६१५३लीना शुक्ला (अपक्ष)५६,३३२लक्ष्मीबेन भानुशाली (मनसे)३,८८९१५४दिलीप लांडे (मनसे)११,१४७गणेश चव्हाण (काँग्रेस)३,७९५१५५ललिता अन्नामल्लई (अपक्ष)९,९०७युसूफ खान (काँग्रेस)४,१२०१५६मोहम्मद अली शेख (समाजवादी)८,४८४हरिश बंदिर्गे (बीजेपी)६,०९११५७मनाली तुळसकर (शिवसेना)९,८५६जेने ज्युलियस (काँग्रेस)७,५६११५८दिलशाद आझमी (समाजवादी)५,३५३अन्सारी मसुद (काँग्रेस)५,२९११५९अश्रफ आझमी (समाजवादी)९,६२१नितेश सिंह (काँग्रेस)३,९८११६0संजना मुणगेकर (शिवसेना)११,२७६सुनीता पवार (एनसीपी)५,०२७१६१सईदा खान (एनसीपी)६,७३०मीनल तुर्डे (मनसे)३,७१११६२अनुराधा पेडणेकर (शिवसेना)७,६६२शेख तबस्सुम (समाजवादी)६,०८२१६३दर्शना शिंदे (शिवसेना)५,५८३पूर्णिमा केणी (मनसे)४,८८६१६४विजय तांडेल (अपक्ष)५,६१४अब्दुल रशिद मलिक (एनसीपी)५,४४७>युतीबाबत अद्यापही संभ्रम असला तरी दावेदारांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या प्रभाग रचनेने दिग्ग्जांना धूळ चारली असून, आपला प्रभाग हातातून निसटून गेलेल्यांनी हाती पडलेल्या प्रभागात अस्तित्वासाठी लढाई सुरू केली आहे.