शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

जगणं शिकविणारी करखेलची शाळा!

By admin | Updated: February 8, 2015 01:27 IST

‘तोतोचान्’ या जगप्रसिद्ध पुस्तकातील तोमाई शाळा... रवींद्रनाथ टागोरांची निसर्गशाळा.. ‘एक होता कार्व्हर’मधील शेती व प्रयोगशाळा..

चेतन धनुरे ल्ल उदगीर (जि. लातूर)‘तोतोचान्’ या जगप्रसिद्ध पुस्तकातील तोमाई शाळा... रवींद्रनाथ टागोरांची निसर्गशाळा.. ‘एक होता कार्व्हर’मधील शेती व प्रयोगशाळा.. अशा वैविध्याने नटलेल्या शाळांशी नातं सांगणारी एक शाळा लातूर जिल्ह्यातही आहे, ती म्हणजे करखेलीची जिल्हा परिषदेची आठ शिक्षकी शाळा. क्रमिक अभ्यासक्रमासोबतच जलपुनर्भरण, कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत अन् बचतीसाठी बँक असे ४४ उपक्रम राबवून जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य ही शाळा करते आहे. करखेली हे लातूर जिल्ह्यातील उदगीरजवळ वसलेले १३२० लोकसंख्येचे एक टुमदार गाव़ गावात पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे़ या शाळेतील शिक्षकांनी पुस्तकांच्या बाहेरचे जग विद्यार्थ्यांना दाखविण्याचा चंग बांधला आहे़ शाळेच्या आवारातच गांडूळ खत प्रकल्प तयार करून विद्यार्थ्यांना जैविक शेतीचे ज्ञान ेदेण्यात येते़ छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून जलसंवर्धनाचे धडे दिले जातात़ रोपवाटिका विकसित करून त्यातील रोपांचे विद्यार्थ्यांना संवर्धनासाठी वाटप करण्यात येते़ कचरा व्यवस्थापनाचा छोटेखानी प्रकल्प तयार करून स्वच्छता राखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात येते़ निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करण्यासाठी शाळेतीलच वडाच्या झाडाखाली निसर्गशाळा तयार करून विद्यार्थ्यांतील अभ्यासाची गोडी वाढविली जात आहे़ मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक वाढविली़ स्वच्छता, जलसंवर्धन, आरोग्य अशा बाबींची मुले प्रार्थनेच्या वेळी शपथ घेतात अन् तसे वागतातही़ प्रामाणिक पेटी, टाकाऊपासून टिकाऊ, तक्रार निवारण आदी उपक्रम या शाळेने राबविले आहेत़ बँकेद्वारे स्वावलंबनाचे धडे़़़विद्यार्थ्यांनी बँकेच्या कामकाजाचे अवलोकन करून शाळेतच अफलातून नावाची बँक उघडली आहे़ या बँकेत व्यवस्थापक, रोखपाल, लिपिकही विद्यार्थीच आहेत़ सभासदांना पासबुक देऊन बचत करण्यास प्रेरित केले जाते़ १ रुपयापासून ते १० रुपयांपर्यंत विद्यार्थी खात्यात रक्कम जमा करतात़ गरजेवळी योग्य कारण देऊन त्यांना खात्यातील रक्कम काढताही येते़ आम्ही मुलांना पुस्तकं शिकवित होतो, पण ती त्यांना जगणं शिकवित नव्हती. आम्ही पुढाकार घेतला आणि ४४ उपक्रमांद्वारे मुलांना जगणं आणि जबाबदारी दोन्ही गोष्टी सहजपणे शिकवू शकलो. - भरत निलेवाड, मुख्याध्यापक, जि. प. शाळा करखेली.या शाळेने पारंपरिक शिक्का पुसलाच शिवाय झाडाखाली वर्ग भरून, रोपवाटिका चालवून विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध जैविक शेती मातीचे शिक्षण देत ‘कार्व्हर’च्या शेतीशाळेशी शिक्षण अशी सांगड घालून नवा विचार दिला आहे.