शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बँकांची सव्वा कोटींनी फसवणूक

By admin | Updated: July 28, 2016 19:41 IST

शहरातील दोन बँकांची सुमारे सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी नऊ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. २८ : शहरातील दोन बँकांची सुमारे सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी नऊ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शाम चौकातील बँक आॅफ बडोदा आणि आंध्रा बँकेच्या स्थानिक शाखेला हा फटका बसला.आंध्रा बँकेला सुमारे ९८ लाख रुपयांनी फसविण्यात आले. आकाश शिरभाते (विलासनगर, अमरावती), दि. प्रोडन्स ट्रेडिंग कंपनी कन्नमवारनगर ,वर्धा रोड ,नागपूर व अन्य एका महिलेने आंध्रा बँकेत खोटी कागदपत्रे सादर केली. ती कागदपत्रे खरी असल्याची बतावणी करून बँकेकडून ९८ लाख रूपयांचे कर्ज घेतले.

कर्जाची परतफेड न करता आंध्रा बँकेची फसवणूक केली. सर्च रिपोर्टमध्ये हा प्रकार उघड झाला. प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आंध्रा बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. २६ फेबु्रवारी २०१४ पूर्वी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. शाखा व्यवस्थापक पी.फनी यांच्या तक्रारीवरुन शहर कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुध्द नोंदविला आहे.

याशिवाय शाम चौकातील बँक आॅफ बडोदा या शाखेची २१ लाख ४० हजारांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप नामदेवराव कळसकर, नितीन नामदेवराव कळसकर, पुरुषोत्तमनगर ,नरेंद्र देवीदासराव नलगे (रा.स्वावलंबीनगर) आणि अन्य दोन महिलांविरुध्द शहर कोतवाली पोलिसांनी कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आंध्रा बँकेकडे गहाण ठेवलेली मालमत्ता पुन्हा तारण ठेवण्यात आली. २५ जानेवारी २०१३ रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक तेजसिंग श्रीरंगीलाल मिना यांनी तक्रार नोंदविली.