शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

करोडपती उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 00:48 IST

या वेळच्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे, या निवडणुकीत उभे असलेले लक्षाधीश उमेदवार.

या वेळच्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे, या निवडणुकीत उभे असलेले लक्षाधीश उमेदवार. मुंबई, पुणे, नागपूर या महानगरातील महापालिका निवडणुकीत आजवर जेमतेम एक-दोन लक्ष्मीपती उमेदवार उभे असायाचे. या वेळी हा आकडा खूप मोठा झाला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांसाठी उभे असलेल्या काही उमेदवारांची संपत्ती पन्नास कोटींहून अधिक आहे. धनवंतांनी निवडणूक लढवू नये, असा काही नियम नाही, पण आजवर व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योजक निवडणुकीच्या राजकारणापासून चारहात लांब असत, पण आता राजकारणाचेच व्यावसायिकरण झाल्याने, ते तरी कशाला मागे राहतील?पराग शहा (भाजपा ) 689 कोटी मुंबईच्या ‘एन’ वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून भाजपाने व्यावसायिक पराग शहा यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. भाजपाच्या या ‘रईस’ उमेदवाराची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख दोन हजार ३२७ कोटी रुपये इतकी आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड असलेल्या मन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ते प्रमोटर आहेत. त्यांच्या नावावर ३९१ कोटी २१ लाख ५५ हजार १८० रुपये, पत्नीच्या नावावर २३८ कोटी ८० लाख ७१ हजार ३६५ रुपये आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर ४० कोटी ५४ लाख ७५ हजार २८२ रुपयांची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिक असलेल्या शहांच्या नावे एक रुपयाचेही कर्ज नाही.यामिनी जाधव (शिवसेना) 6 कोटी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१० मधून निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना उमेदवार यामिनी जाधव या पदवीधर असून व्यवसाय उद्योगात आहे. प्रतिज्ञापत्रात त्याची तपशीलवार माहिती त्यांनी भरली आहे. यामिनी जाधव यांच्याकडे एक लाखाची रोख रक्कम असून, बँक खात्यात १३ लाख १३ हजार ५३९ रुपये आहे. तर पती यशवंत जाधव यांच्याकडे सव्वा लाखांची रोख रक्कम असून, बँक खात्यात ९ लाख ९० हजार ४४१ रुपये आहेत. यामिनी यांचे सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये ९७ लाख १ हजार ९० रुपये थकीत आहेत. २०१२ सालीही यामिनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.धर्मेश व्यास ( काँग्रेस ) ७ कोटी मुंबईतील प्रभाग क्रमांक ८७ मध्ये काँग्रेसकडून धर्मेश व्यास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या व्यवसाय असल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. २00७ साली व्यास यांनी निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांची मालमत्ता १0 लाख ८८ हजार ७९ रुपये होती. मात्र, त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून व्यास यांच्या मालमत्तेत आता भरमसाठ वाढ झाल्याचे दिसते. यांच्या नावे जंगम मालमत्ता ३ कोटी ५ लाख २५ हजार ९७३ रुपये आहे. यात बँक व वित्तीय संस्था व बँकेव्यतिरिक्त वित्तीय कंपन्यांमधील ठेवी ४९ लाख ३८ हजार २७४ एवढी, तर त्यांची पत्नी रूपा व्यास यांच्या नावे १६ लाख २१ हजार ४६४ रुपये आहे. तुलिप ब्राईन मिरांडा (काँग्रेस) ४२ कोटीतुलिप मिरांडा यांना प्रभाग ९0 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गृहिणी असलेल्या तुलिप मिरांडा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण मालमत्ता ४२ कोटी ५९ लाख ६३ हजार ९१२ रुपये आहे. त्यांच्या नावे जंगम मालमत्तेत रोख रक्कम २५ हजार तर त्यांच्या पतीच्या नावेही तेवढीच रक्कम आहे. बँक वित्तीय संस्था व बँकेव्यतिरिक्त वित्तीय कंपन्यांमधील ठेवी तुलिप यांच्या नावे ३ लाख ३९ हजार ४९९ तर त्यांचे पती ब्रायन मिरांडा यांच्या नावे ६८ लाख ५ हजार २0१ रुपये आहे. तुलिप यांच्याकडे २२ लाखांचे जडजवाहीर तर त्यांच्या पतीच्या नावे तेवढ्याच किमतीचे जडजवाहीर आहे. अकृषिक जमीन आणि घरे आहेत. त्यांची एकूण किंमत ही ४0 कोटी ९९ लाख ६९ हजार २१२ रुपये एवढी आहे. स्नेहलता बोदर्डे ( काँग्रेस) १२ कोटी एन वॉर्डच्या प्रभाग क्रमांक १२३ मधून काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या बोदर्डे पाचवीपर्यंत शिकल्या असून, त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांच्या स्वत:च्या नावे बँकेत ५२ लाख ३५ हजार रुपये आहेत, तर वित्तीय ठेव एक लाख रुपये तसेच जडजवाहीर सहा लाख १५ हजार रुपयांची आहेत. त्यांच्या पतीच्या नावे एक कोटी ७५ लाख ७३ हजार ४१३ रुपयांची ठेव आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २४ लाख ९३ हजार ०२७ रुपये इतके आहे, तर कुटुंबाची जंगम मालमत्ता दोन कोटी ३६ लाख २८ हजार ४१३ रुपये आहेत, तर स्थावर मालमत्ता १० कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. मीनाक्षी पाटील (राष्ट्रवादी) ७ कोटीमुलुंड पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक १०४ मधून राष्ट्रवादी पक्षांकडून उभ्या राहिलेल्या मीनाक्षी पाटील यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. त्यांची एकूण मालमत्ता ७,कोटी,८५ लाख ४६ हजार इतकी आहे. त्यांचा व्यापार असून, स्वत:च्या खात्यात २२ लाख ८८ हजार रुपयांची ठेवी आहे. नाशिक, ठाणे येथील जमिनींसह त्यांचे मुलुंड आणि नाशिकमध्ये फ्लॅट आहे. बाजार भावानुसार त्याची किंमत ५ कोटी ५२ लाख ७ हजार रुपये आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ लाख १८ हजार ७२६ आहे. त्यांना तीन अपत्य आहे. त्या २०१२ ला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तेव्हा त्यांची मालमत्ता १ कोटी ३० लाख २७ हजार रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. तीन वर्षांत ती ७ कोटींवर पोहोचली हे आश्चर्य आहे. भारती धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी ) ६ कोटी भांडुपच्या प्रभाग क्रमांक १११ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भारती पिसाळ या माजी नगरसेविका आहेत, तर त्यांचे पती व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आणि महापालिकेत गटनेते आहेत. त्यांनी एकूण मालमत्ता ६ कोटी १७ लाख ८ हजार ३२४ रुपये इतकी प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. त्यांची सातारा येथे शेत जमीन आहे. तर मस्जिद बंदर परिसरातही त्यांची मालमत्ता आहे. त्यांच्या स्वत:च्या नावावर ३ कोटी ३१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर पतीच्या नावावर १ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांच्या स्थावर मालमत्तेची नोंद प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १९ लाख ७० हजार १६० एवढे आहे.डॉ.सईदा खान (राष्ट्रवादी) ७ कोटीएल वॉर्ड, प्रभाग क्रमांक १६८ मधील डॉ.सईदा खान या कोट्याधीश असून, मुंबई महापालिका निवडणूक रिंगणातील उच्चशिक्षित उमेदवार आहेत. खान यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३० लाख २९ हजार २३० रुपये असून, त्यांच्याजवळ १ कोटी ८ लाख २ हजार ३७० रुपयांच्या किमतीची जंगम मालमत्ता आहे, तर ६ कोटी १८ लाख ४५ हजार २१० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सईदा यांच्याकडे ३० लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने आहे. दादर, परळ आणि सांताक्रुझ येथे प्रत्येकी एक सदनिका असून, बाजारभावानुसार त्यांचे एकूण मूल्य २ कोटी ८८ लाख ६५ हजार रुपये आहे. खान यांच्यावर ३१ लाख ३५ हजार ३० रुपयांचे कर्ज आहे.नितेश राजहंस सिंह (काँग्रेस ) २५ कोटी मुंबई महापालिका निवडणुकीत कोट्याधीश उमेदवारांत प्रभाग क्रमांक १६६ मधील काँग्रेस पक्षाचे नितेश राजहंस सिंह हेदेखील आहेत. माजी आमदार राजहंस सिंह यांचे ते पुत्र आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सिंह यांच्याकडे एकूण २५ कोटी ७२ लाख ९३ हजार ३१९ रुपये इतकी संपत्ती आहे. पोस्टात सिंह यांची एक कोटी १० लाख रुपयांची गुंतवणूक आहे. ७ कोटी ३४ लाख ४१ हजार ३५९ रुपयांचे स्थावर मालमत्ता आणि १८ कोटी ३८ लाख ५१ हजार ९६० रुपयांची जंगम मालमत्ता आहे.