शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 17, 2017 20:50 IST

अवकाळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यात नुकसानीचा सर्व्हे सूरुसायखेड : बार्शीटाकळी तालुक्याला १६ मार्च रोजी दुपारी अचानक वादळासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपले होते. चोहोगाव शेतशिवारात लिंबाच्या आकाराची गारपीट झाल्याने रब्बीसह काढणीला आलेल्या पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले.अवकाळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात चोहोगाव, धाबा, चिंचोली रुद्रायणी, लोहगड, सायखेड व कोथळी खुर्द येथे गुरूवारी गारपीट झाली होती, तर महान, पुनोती, मांगुळ, मिर्झापूर, निंबी चेलका, सुकळी, राजनखेड, जामवसू आदी गावांमध्ये वादळासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक नुकसान चोहोगाव शिवारात झाले होते. धाबा येथील मुख्य चौकात असलेल्या झाडावर वीज कोसळली. लोहगड येथील एका नवसाचे रोडग्याचे जेवण आटोपून घरी येताना वादळी पावसामुळे वासुदेव जाधव यांच्या शेतातील घरात काही जण थांबले होते. तितक्यात मुंडालीसह घराचे छत कोसळले. यामध्ये तुळशीराम पवार, राजेश चव्हाण, मंगेश जाधव, ऋषिकेश राठोड आदी गंभीर जखमी झाले होते.तालुक्यात गारपीट, वादळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, निंबू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा मंडळ निहाय तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्या संयुक्त पथकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतात जाउन सर्व्हे करण्याच्या कामास शुक्रवारी सुरूवात करण्यात आली. शेतातील नुकसानीचा प्रत्यक्ष भेट देउन संयुक्तपणे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. तालुक्यातील जवळपास १०० हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (वार्ताहर)तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या मदतीने सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व्हेचा अंतिम पाहणी अहवाल आल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राजेंद्र जाधव, तहसीलदार, बार्शीटाकळी