शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पिकांमध्ये वाढला ९५ टक्के तणनाशकांचा वापर!

By admin | Updated: July 6, 2016 01:19 IST

शास्त्रोक्त पद्धतीअभावी नुकसान; पंदेकृवि देणार तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण.

अकोला : किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणामुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्‍यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे; जवळपास ८0 टक्केच्यावर शेतकरी पिकात तणनाशकांचा वापर करतात. परंतु, तणनाशकाची नेमकी मात्रा न वापरल्याने शेतकर्‍यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरुवातीला गव्हाच्या पिकासह इतर पिकावर तणनाशक वापरण्यासंबंधी कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याची शिफारस राज्यस्तरीय संशोधन सल्लागार आढावा समिती (जॉइंट अँग्रोस्को) कडे केली होती. ती शिफारस मान्य झाली असून, आता इतर पिकांवरील तणनाशक वापरासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या अगोदरच महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या या शिफारशींना संयुक्त संशोधन आढावा परिषदेची मान्यताही मिळाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर गहू पिकासाठी तणनाशकांचा योग्य वापर करण्यासाठी मान्यता मिळाली असून, शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पश्‍चिम विदर्भात तणनाशकांचा वापर अधिक या विद्यापीठाने गतवर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता तालुके व गावं निवडण्यात आली होती. तणनाशक वापरासंबंधी असलेले ज्ञान, त्याचा अवलंब आदींबाबत या शेतकर्‍यांकडून माहिती घेण्यात आली. सोयाबीनबाबत शिफारस केली असली, तरी गहू या पिकात शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहेत; पण त्याचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याने ५0 टक्केच्या जवळपास नुकसान होत आहे.