शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

मेट्रोसाठी कर्जावर राजकीय पक्षांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 00:24 IST

मेट्रोसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर हा प्रकार म्हणजे लग्नाआधी वरात काढणे असल्याची टीका राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

पुणे : मेट्रोसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर हा प्रकार म्हणजे लग्नाआधी वरात काढणे असल्याची टीका राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष पुणेकरांची फसवणूक करीत असल्याची चर्चा काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडून होत आहे.पुणेकरांप्रती केंद्र व राज्य सरकारला इतकेच प्रेम असेल तर त्यांनी पुणेकरांना कर्जात ढकलण्याऐेवजी स्वत: निधी मंजूर करावा, अशी मागणी याबाबत बोलताना महापौर प्रशांत जगताप यांनी केली. केंद्र सरकारने पुणेकरांच्या भावनांशी असे खेळू नये, कर्जाला हप्ते असतात हे कळण्याऐवढे पुणेकर सुज्ञ आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासकामाचे निर्णय घेऊ नयेत, मेट्रोला मंजुरी द्यावी, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, त्यानंतरच कर्जाच्या गोष्टी कराव्यात, असे महापौर म्हणाले.काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल व नगरसेवक संजय बालगुडे यांनीही कर्ज प्रकरणावरून भाजपाला धारेवर धरले आहे. बागूल यांनी केंद्र व राज्य सरकार पुणे महापालिकेला कर्जबाजारी करीत असल्याची टीका केली. कर्ज काढण्याअगोदर ते फेडणार कशातून ते दाखवावे लागते. केंद्र व राज्य सरकारने त्यासाठी काय तरतूद केली आहे ते जाहीर करावे, अशी मागणी बागूल यांनी केली. बालगुडे यांनी हा तर पुणेकरांना कर्जबाजारी करण्याचा डाव असल्याची टीका केली. स्मार्ट सिटी, पीएमपीएल, २४ तास पाणीपुरवठा योजना अशा विविध योजनांसाठी एकूण १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येत आहे. ते फेडण्यासाठी पुणेकरांवर जादा कराचा बोजा लादण्यात येणार आहे. याविषयी पक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे बालगुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पुण्याने भाजपाला १ खासदार व ८ आमदार दिले. तरीही मेट्रोची मंजुरी अडीच वर्षे अडवून ठेवली आहे. मंजुरी नसताना वर्ल्ड बँक व एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांनी ६३५० कोटी रुपयांचे कर्ज मान्य केल्याचे सांगितले जात आहे. मेट्रोसाठीच्या कंपनीला हे कर्ज मिळणार आहे. ते कर्ज असताना भाजपाकडून निधी असल्याचा देखावा निर्माण केला जात आहे.- प्रशांत जगताप, महापौर