शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नाले, गटारांवरील निकृष्ट झाकणे की मृत्यूचे सापळे

By admin | Updated: June 27, 2016 02:37 IST

वास्तविक, हा विषय येथेच संपत नाही. लोकवस्तीत झाकण नसलेल्या नाल्याजवळ अथवा गटाराजवळ अशा घटना नेहमी घडत असतात.

- पंढरीनाथ कुंभारवास्तविक, हा विषय येथेच संपत नाही. लोकवस्तीत झाकण नसलेल्या नाल्याजवळ अथवा गटाराजवळ अशा घटना नेहमी घडत असतात. यापूर्वी २०१३ साली पावसाळ्यात याच झाकण नसलेल्या नाल्यात पडलेली एक मुलगी वाहून गेली होती. भरपावसात तीन दिवस तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. शांतीनगर भागात गुलजारनगर, वॉर्ड क्र. १९ मध्ये हा नाला असून या नाल्यावर मनपाने लावलेली लोखंडी जाळ्यांची झाकणे चोरली जात आहेत. त्यामुळे उघड्या नाल्यात जनावरेदेखील पडून मेली आहेत. दीड वर्षापूर्वी गोणीत बांधलेले प्रेत सापडले होते. काही दिवसांपूर्वी नाल्याच्या उघड्या झाकणांतून दोन मुले पडली होती. त्यांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले. शहरातील कणेरी भागातील बिंदू सायझिंगमागे असलेल्या उघड्या गटारात पडून मुलगी मृत झाल्याची घटना यापूर्वी घडली, तर ठाणा रोड, गौरीपाडा भागातील टेलिफोन कार्यालयाजवळ गटारावरील झाकण योग्य रीतीने न बसवल्याने दुचाकी चालवणाऱ्या मुलीचा अपघात होऊन मृत्यू झाला. या सर्व घटना होत असताना बांधकाम विभागातील अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत.महानगरपालिकेचे ४५ प्रभागांत ९० वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात व प्रभागात झाकण नसलेली गटारे किंवा नाले दिसतील. शहरात कामगारवर्ग मोठ्या संख्येने राहत असल्याने झोपडपट्टी व कामगार वस्तीतील गटारांवरील झाकणे चोरीस जाण्याचे प्रमाण जास्त आहे. नाले व गटारांवर लोखंडी जाळ्यांची झाकणे लावण्यासाठी मनपा प्रशासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असते. काही परिसरांतील व्यसनी, चरसी व नशेबाज लोक रात्रीच्या अंधारात ही लोखंडी झाकणे काढून भंगाराच्या दुकानांत विकतात. शहरातील भंगाराच्या दुकानांतून अशी झाकणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. ही कारवाई कायम होत नसल्याने येथील भंगाराचा धंदादेखील अशा चोरांकडून चांगला होतो. मनपा बांधकाम विभागातील अधिकारी वारंवार होणाऱ्या या घटनांपासून बोध घेऊन लोखंडी जाळ्यांऐवजी कायमस्वरूपी टिकणाऱ्या सिमेंटच्या अथवा फायबरच्या जाळ्या बसवण्याचा निर्णय घेत नाहीत.