शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडयातील पिके संकटात

By admin | Updated: October 4, 2016 05:29 IST

सातत्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असली तरी, अतिवृष्टीमुळे तब्बल १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकावर पाणी पडले आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबई सातत्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असली तरी, अतिवृष्टीमुळे तब्बल १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकावर पाणी पडले आहे. या ‘ओल्या’ संकटामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले आहे.औरंगाबाद येथे ४ आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा प्राथमिक अहवाल मागवला गेला. त्यातून ही आकडेवारी समोर आली असून मंत्रीमंडळ बैठकीत यावर कोणता निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर केल्याने काढणीस आलेली सोयाबिन, तूर, कापूस आदी पिके पाण्यात गेली आहेत. सोयाबिनच्या शेंगा जागेवरच फुटत असून तूर पिवळी पडली आहे, असे कृषी विभागाने सरकारला कळवले आहे.परतीच्या पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन, उडीद, बाजरी, तूर, कांदा, ज्वारी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येत्या दोन दिवसात या भागात आणखी पाऊस होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे पाऊस थांबल्यावर केले जातील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. जर पंचनामे नंतर होणार असतील आणि नुकसानीची स्पष्टता येणार नसेल तर मंत्रिमंडळ बैठकीत कशाच्या आधारावर निर्णय घेतले जातील, असा सवाल केला जात आहे.

अशी झाली पिकाची हाणी

जिल्हा   क्षेत्र/हेक्टर    बाधित पिकेऔरंगाबाद५४२०कापूस, मका, सोयाबिनजालना४४९४कापूस, सोयाबिन, उडीदबीड४,६९,३११बाजरी, सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, ज्वारीलातूर५,०५,३४०बाजरी, सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, ज्वारीउस्मानाबाद२,९४,६७६सोयाबिन, तूर, ज्वारी, बाजरी, भात, मका,भूईमूग, सूर्यफूल, तीळ, कापूसनांदेड१,५१,६१७सोयाबिन, कापूस, ज्वारी, हळद, तूरपरभणी५८,५३८सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, भाजीपालाहिंगोली१४९सोयाबिन व हळद