शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘सीरिअल किलर’च्या क्रौर्याचा पर्दाफाश !

By admin | Updated: December 9, 2014 23:17 IST

कऱ्हाड-औंधमधील हत्यासत्र : दागिन्यांसाठी तिघींचा बळी, एकीवर खुनी हल्ला

कऱ्हाड : दागिन्यांसाठी वृद्ध महिलांचा खून करणाऱ्या ‘सीरिअल किलर’चा कऱ्हाड तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या आरोपीकडून आतापर्यंत तीन खून व एक खुनाचा प्रयत्न असे चार गंभीर गुन्हे उघडकीस आलेत. रक्तपात करून त्याने चोरलेल्या दागिन्यांपैकी काही ऐवज पोलिसांच्या हाती लागला असून, इतर मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. वडोली-निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील यशोदा भोसले या वृद्धेचा खून झाल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे फिरवली. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीने झालेल्या गुन्ह्यांचा पोलीस पथकाने मागोवा घेतला. या सर्व प्रकरणांत एकाच आरोपीचा हात असावा, अशी शक्यता निर्माण झाली. अशातच या प्रकरणात काशिनाथ काळे याचा हात असल्याची माहिती समोर आली. रविवारी (दि. ७) रात्री काशिनाथ काळे कऱ्हाडातील प्रभात चित्रमंदिरात चित्रपट पाहण्यासाठी आला असताना सहायक निरीक्षक स्वप्निल लोखंडे, हवालदार सज्जन जगताप, खलील इनामदार यांनी पाठलाग करून त्याला पकडले.कसून तपास केल्यानंतर गुन्ह्याची कबुली देत त्याने वडोली-निळेश्वरमधील यशोदा भोसले यांचे चोरलेले दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. वडोलीतील खुनाबरोबरच त्याच्याकडून अन्य तीन गुन्हेही उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड येथे जुन्या कोयना पुलानजीक २२ सप्टेंबर २०१३ रोजी लीलाबाई अण्णा पवार (वय ६५) या वृद्धेचा (पान १० वर)काशिनाथ काळेची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्याच्याकडून निष्पन्न झालेले गुन्हे पाहता प्रतिकार न करू शकणाऱ्या वृद्ध महिलांवरच अत्यंत क्षुल्लक कारणासाठी त्याने हल्ले केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीबाबत आणखी काही माहिती असल्यास नागरिकांनी ती पोलिसांना द्यावी. संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल.- मितेश घट्टे, पोलीस उपअधीक्षक, कऱ्हाडदारू, चित्रपटावर उधळले पैसेकाशिनाथ काळेने महिलांचा खून करून चोरलेले काही दागिने विकले. त्यातून मिळालेल्या पैशांतून तो दररोज मद्यप्राशन करीत होता. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत होता. तसेच काही वेळा तो वेश्यावस्तीत जाऊन आल्याचेही आजपर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले.