शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांना तिकीट नाही

By admin | Updated: October 16, 2016 00:25 IST

शहरातील राजकारणात मला अंधारात ठेवून काम केले जात नाही, तसे कोणी करूही शकत नाही. आम्ही गुन्हेगारीच्या विरोधात रान उठवण्याचे काम केले आहे. आघाडी सरकार

पुणे : शहरातील राजकारणात मला अंधारात ठेवून काम केले जात नाही, तसे कोणी करूही शकत नाही. आम्ही गुन्हेगारीच्या विरोधात रान उठवण्याचे काम केले आहे. आघाडी सरकार उधळून लावले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव आहे़ महापालिका निवडणुकीत कोणत्याही गुन्हेगाराला तिकीट दिले जाणार नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. गुंड कमलाकर उर्फ बाबा बोडके व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचे छायाचित्र शुक्रवारी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बापट पत्रकारांशी बोलत होते. अनेक व्यक्ती मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. त्यांना भेटले म्हणजे तिकीट दिले जाईल, असे होत नाही. तसेच काही व्यक्ती मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव साधत आहेत, असेही बापट म्हणाले. दरम्यान, सामाजिक उपक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ठरली होती़ बाबा बोडके हे आमचे नातेवाईक असून, ते आमच्यासोबत आले होते़ त्याबाबत मुख्यमंत्री अनभिज्ञ होते, असे स्पष्टीकरण हावरे लीग आणि ग्रॅव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार मिहीर कुलकर्णी यांनी दिले़ या वेळी उज्ज्वला हावरे उपस्थित होत्या़ ६ नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असून या कार्यक्रमाला बाबा बोडकेही पे्रक्षकांमध्ये उपस्थित असतील, असेही त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)महापौरांनी मेट्रोबाबत राजकारण आणू नयेमहापौरांनी मेट्रो प्रकरणात राजकारण आणू नये. प्रकल्पाला उशीर झाल्याने नुकसान झाल्याचे ते सांगत आहेत. मात्र, दहा वर्षे उशीर झाला आहे, त्याचे पैसे मी मागू का? - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे