शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या नगरसेवकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: February 6, 2017 02:21 IST

येथील कर्नाळ रस्त्यावरील अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (२२) या तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार यांच्यासह सहाजणांविरुद्ध सांगली शहर

सांगली : येथील कर्नाळ रस्त्यावरील अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (२२) या तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार यांच्यासह सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक संदीप पवार, अर्जुन पवार, सचिन चौगुले, भैय्या पवार, नागेश धोत्रे व रामा पवार (सर्व रा. पंढरपूर) यांचा समावेश आहे. बबलू सुरवसे हा मूळचा पंढरपूरचा आहे. दोन वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये नीलेश माने या तरुणाचा खून झाला होता. या खूनप्रकरणी बबलूला अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी त्यास सांगलीत मामाकडे राहायला पाठविले होते. तेव्हापासून बबलू सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे मामाकडे राहतो. शनिवारी दुपारी सहा जणांच्या टोळीने त्याच्यावर गोळीबार केला होता. नेम चुकल्याने बबलू बचावला होता.नीलेश माने याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नगरसेवक संदीप पवार व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती बबलूच्या चौकशीतून पुढे आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)