शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ््याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे

By admin | Updated: February 24, 2016 00:56 IST

घोडाझरी कालव्याच्या कामातील गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता (निवृत्त) तसेच कंत्राटदारासह सात

नागपूर : घोडाझरी कालव्याच्या कामातील गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता (निवृत्त) तसेच कंत्राटदारासह सात जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता (निवृत्त)सोपान, निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश वर्धने , एफ. ए. कन्स्ट्रक्शन्सचा संचालक फतेह मोहम्मद अब्दुल खत्री, निसार फतेह खत्री, जैतून फतेह मोहम्मद खत्री, अबिद खत्री आणि जाहिद खत्री यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. विदर्भ पाटबंधारे विभागाअंतर्गत गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उघड चौकशी करण्याचे आदेश एसीबीला देण्यात आले होते. त्यानुसार, नागपूर एसीबीच्या विविध अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकल्पाची चौकशी सुरू झाली. पोलीस निरीक्षक युवराज पतकी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या ४२.६० ते ८८ किलोमीटरमधील मातीकाम तसेच बांधकामाची चौकशी केली. त्यात निविदा प्रक्रियेपासून ते कोट्यवधींची रक्कम उचलेपर्यंतच्या प्रक्रियेत उघड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडाझरी शाखा कालव्याच्या बांधकामासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास महांमडळाने २००६ मध्ये निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदार कंपन्यांनी सहभाग घेतल्याचे आणि त्यापैकी एफ. ए. कन्स्ट्रक्शन्स कंपनीला कालव्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आल्याचे दाखविले. संबंधित अधिकाऱ्यांनी एफ. ए. कन्स्ट्रक्शन्सला काम मिळवून देण्यासाठी श्रद्धा कन्स्ट्रक्शन्स अ‍ॅन्ड पॉवर जनरेशन कंपनी प्रा. लि. या कंपनीच्या नावे लेटरपॅड बनवून निविदा प्रक्रियेत कंपनीचा सहभाग दर्शविला. एफ. ए.च्या संचालकांनी बनावट अनुभव प्रमाणपत्रेही सादर केली. (प्रतिनिधी)