शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधास भाग पाडल्याचा पोलिसांवर गुन्हा

By admin | Updated: February 14, 2017 03:55 IST

कोठडी मृत्यू प्रकरणी वडाळा जीआरपीशी संबंधित असलेल्या पोलिसांवर भारतीय दंडसंहिता कलम ३७७ अंतर्गत...

मुंबई : कोठडी मृत्यू प्रकरणी वडाळा जीआरपीशी संबंधित असलेल्या पोलिसांवर भारतीय दंडसंहिता कलम ३७७ अंतर्गत (अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे) व प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल आॅफेन्स अ‍ॅक्ट (पॉक्सो)च्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती सोमवारी सीबीआयने उच्च न्यायालयाला दिली. मात्र या सर्व आरोपी पोलिसांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असेही सीबीआयने स्पष्ट केले.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला आरोपी पोलिसांवर आयपीसी कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवणे शक्य आहे का, अशी विचारणा करत याबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी अंतिम दोषारोपपत्र तयार असून त्यामध्ये आरोपी पोलिसांवर त्यांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांना अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप ठेवला असल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.‘आरोपींवर हत्येचा आरोप ठेवला जाऊ शकत नाही. कारण तसे पुरावे हाती लागलेले नाहीत. आता अंतिम दोषारोपपत्र तयार असून लवकरच ते दाखल करण्यात येईल,’ असे सीबीआयने न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनंतर हायकोर्टाने या याचिकेवरील सुनावणी ९ मार्च रोजी ठेवली आहे. अ‍ॅग्नेलो वालद्रीसचा वडाळा जीआरपीच्या ताब्यात मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पोलिसांनी केलेल्या छळामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा वालद्रीस यांनी केला आहे. (प्रतिनिधी)