शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: September 18, 2016 00:37 IST

योग्य उपचार न दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोथरूडच्या कृष्णा हॉस्पिटलविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे : योग्य उपचार न दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोथरूडच्या कृष्णा हॉस्पिटलविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांवर नातेवाइकांनी निष्काळजणीपणाचा आरोप केला आहे. सतीश अंकुश मोहोळ असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. संतोष अंकुश मोहोळ (वय ३८, रा. केळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश यांच्या छातीत दुखू लागल्यावर त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी केला नाही. त्यांना केवळ गॅसेसचा त्रास असल्याचे सांगत इंजेक्शन व औषधे देऊन घरी पाठवून दिले. घरी गेल्यावर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घालत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्या असल्याचेही निदर्शनास आले. रुग्णालयाने मात्र आपली कोणाविरुद्धही तक्रार नसून गर्दीमुळे काचा फुटल्याचे पत्र पोलीस ठाण्याला दिले आहे. (प्रतिनिधी)