शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून ४ स्वतंत्र राज्ये निर्माण करा - मा.गो.वैद्य

By admin | Updated: January 14, 2017 20:29 IST

आपल्या देशात राज्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. त्यामुळेच ३ कोटींच्या लोकसंख्येप्रमाणे राज्यांची निर्मिती करायला हवी.

ऑनलाइन लोकमत  
नागपूर, दि. 14 -  आपल्या देशात राज्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. त्यामुळेच ३ कोटींच्या लोकसंख्येप्रमाणे राज्यांची निर्मिती करायला हवी. यामुळे सुलभ राज्यप्रशासन होऊ शकते. या हिशेबाने महाराष्ट्रातून विदर्भासह ४ स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले. 
 
विदर्भ राज्य निर्मितीसाठी लढणा-या सर्व विदर्भवादी संघटनांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाची सुरुवात करण्यात आली आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने परत जोर धरला आहे. मुळात चांगला व सुरळीत राज्यकारभार चालावा यासाठी लहान राज्यांची आवश्यकता असते. 
 
आपल्या देशात उत्तरप्रदेशची लोकसंख्या २० कोटींच्या जवळ आहे तर दुसरीकडे सिक्कीम राज्याची लोकसंख्या ६ लाख १० हजार आहे. त्यामुळे देशात समान लोकसंख्येच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. यासाठी केंद्राने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली पाहिजे, असे मा.गो.वैद्य म्हणाले.देशात छत्तीसगड वगळता सर्व लहान राज्यांच्या निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला. मुळात राज्यांची निर्मिती ही आंदोलनाशिवायच झाली पाहिजे, असेदेखील वैद्य म्हणाले.